Advertisement

कोण करणार 'एक टप्पा आऊट'?

मागील काही दिवसांपासून 'एक टप्पा आऊट' हा स्टँड अप कॅामेडीवर आधारित असलेला शो चांगलाच गाजत आहे. हा शो अंतिम टप्प्यात पोहोचला असून, यामध्ये कोण 'एक टप्पा आऊट' करत महविजेतापदावर आपलं नाव कोरणार ते पहायचं आहे.

कोण करणार 'एक टप्पा आऊट'?
SHARES

मागील काही दिवसांपासून 'एक टप्पा आऊट' हा स्टँड अप कॅामेडीवर आधारित असलेला शो चांगलाच गाजत आहे. हा शो अंतिम टप्प्यात पोहोचला असून, यामध्ये कोण 'एक टप्पा आऊट' करत महविजेतापदावर आपलं नाव कोरणार ते पहायचं आहे.


६ स्पर्धक अंतिम सोहळ्यात

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'एक टप्पा आऊट'ची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून विनोदवीरांचा शोध घेतल्यानंतर सहा स्पर्धकांची अंतिम सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धकानं आपल्या वेगळ्या शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. महाअंतिम सोहळ्याची चुरस रंगणार आहे. या शोमध्ये छोट्या-मोठ्या पडद्यावरील दिग्गजांची धमालही पहायला मिळणार असून, परीक्षकाच्या खुर्चीत बसून स्पर्धकांच्या कलागुणांचं मूल्यमापन करणाऱ्या भरत जाधव, जॅानी लिव्हर आणि निर्मिती सावंत यांची कमालही...


 ग्रॅण्ड फिनालेमध्ये परफॉर्म 

महाअंतिम फेरीच्या सोहळ्यात लातूर पॅटर्न बालाजी, नालासोपाऱ्याचा बंटाय केतन, मुंबई लोकल रोहित, अमरावतीचा करामती प्रविण, मालाडचा गोरेगावकर अनिश आणि बडे नामवाला श्रीवल्लभ या सहा स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या सहा स्पर्धकांनी महाअंतिम सोहळ्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळं 'एक टप्पा आऊट'चं महाविजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सहा स्पर्धकांसोबतच रेशम टिपणीस, आरती सोळंकी आणि विजय पटवर्धन या तीनही मेंटॉर्समध्येही ही चुरस रंगणार आहे. कारण या तिघांचेही स्पर्धक ग्रॅण्ड फिनालेमध्ये परफॉर्म करणार आहेत.


मोलकरीण बाई' ची हजेरी

'एक टप्पा आऊट'च्या महाअंतिम फेरीच्या सोहळ्याची खासियत आणि आकर्षण ठरणार आहेत ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे, हर्षदा खानविलकर आणि 'मोलकरीण बाई' या मालिकेची टीम. या मालिकेची संपूर्ण टीम महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावणार आहे. त्यामुळं प्रेक्षकांना आपल्या आवडत्या मालिकेतील कलाकारांची धमालही 'एक टप्पा आऊट'च्या महाअंतिम फेरीच्या सोहळ्यात पहायला मिळणार आहे.हेही वाचा  -

प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिगंबर आणि माधवनं शिवला दिला सल्ला
संबंधित विषय