Advertisement

‘स्मार्ट, शाश्वत शेती'चे प्रदर्शन


‘स्मार्ट, शाश्वत शेती'चे प्रदर्शन
SHARES

माटुंगा - ‘डीडीयू कौशल्य केंद्रा'च्या वतीने रामनारायण रुईया महाविद्यालयात हरितगृह व्यवस्थापन विभागातर्फे आणि ब्लूम आणि CRAFT (सेंटर फॉर रिसर्च इन अल्टरनेटीव्ह फार्मिंग टेक्नोलॉजिस) यांच्या सहकार्याने प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींपासून ते फळ आणि फुलझाडे सुद्धा होती. त्याचबरोबर या सर्व झाडा-फुलांना लागणारे खत आणि विषमुक्त पिकांसाठी आयुर्वेदीक औषधेसुद्धा येथे मांडण्यात आली होती. प्रामुख्याने शहरी भागात म्हणजेच सिटी फार्मिंगही कशाप्रकारे लोकांना सहज आणि सोप्या पद्धतीने करता येईल हे इथे सांगण्यात आले. यावेळेस डीडीयू कौशल्य केंद्राच्या संचालिका अनुश्री लोकूर आणि भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी आणि हायड्रोपोनिक हरितगृह तंत्रज्ञान भारत प्रा.ली. चे संस्थापक सी.वि. प्रकाश यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा