Advertisement

21 तारखेला माटुंग्यात रंगणार 'आराधना'!


21 तारखेला माटुंग्यात रंगणार 'आराधना'!
SHARES

मनमोहक नृत्य, त्याला भावपूर्ण संगीताची आणि उत्तम निवेदनाची जोड मिळाल्यावर उभी राहणारी सुंदर कलाकृती आनंदाची अनुभूती देऊन जाते. श्रृंगाररसाची अनोखी अनुभूती देणारा कथ्थक नृत्यावर आधारित ‘आराधना’‘त्रिधारा’ हा कार्यक्रम येत्या रविवारी २२ ऑक्टोबरला सकाळी १०.०० वा. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे रंगणार आहे. प्रसिद्ध नृत्यांगणा दीपाली विचारे यांच्या ‘दीपाली विचारेज अकॅडेमी ऑफ आर्ट्स’ आणि ‘आरत’ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.



‘आराधना’ हा दीपाली विचारेज अकॅडेमी ऑफ आर्ट्सचा वार्षिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात दीपाली विचारे यांच्या सगळ्या शिष्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील गीतांवर ताल अंगाच्या साथीने कथ्थक नृत्याविष्कार सादर करतील. नृत्यांगणा दीपाली विचारे व त्यांच्या सिनिअर शिष्या त्रिधारा सादर करतील. त्रिधारेतून ‘श्रृंगारापासून भक्तीरसा’पर्यंतचा प्रवास दाखवला जाईल. त्रिधारेचे वैशिष्ट्य म्हणजे दीपाली विचारे यात स्वत: कवितेच्या सादरीकरणासह नृत्याविष्कार करणार आहेत. सितार, तबला आणि घुंगरांची जुगलबंदी असलेल्या त्रिधारेतून नृत्याच्या वेगवेगळ्या छटांचे दर्शन रसिकांना घडेल. अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.



हेही वाचा

आता मराठी सिनेसृष्टीतही होणार 'धकधक'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा