• आता मराठी सिनेसृष्टीतही होणार 'धकधक'!
SHARE

चित्रपटांचे वेगळे विषय, ते विषय हाताळण्याची पद्धत आणि दमदार पटकथा यामुळे सध्या मराठी चित्रपटसृष्टीकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. हॉलिवूडमध्ये नाव कमावणारी प्रियंका चोप्रा, रितेश देशमुख अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता यामध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आहे आणि ते म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने!

माधुरी दीक्षित लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट स्त्री केंद्रीत असणार आहे. आपल्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या एका स्त्रीचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचं नाव सध्या तरी ठरलेलं नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभास करणार आहेत. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. डिसेंबरपर्यंत चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 


सौजन्य

या चित्रपटाबद्दल बोलताना माधुरी प्रचंड उत्सुक होती. "मराठी चित्रपट सृष्टीत सध्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट येत आहेत. हासुद्धा त्यापैकीच एक चित्रपट आहे. अनेक वर्षांपासून मराठीत काम करण्याची माझी इच्छा होती. मी मराठीच्या अनेक पटकथा देखील वाचल्या आहेत. पण कोणतीच कथा मला तितकीशी भावत नव्हती. पण ही कथा वाचताच मी तात्काळ हो म्हणाले. कारण या चित्रपटाची कथा प्रेरणादायी आहे," असं माधुरी दीक्षितनं सांगितलं.

माधुरीनं मराठी चित्रपटात काम करावं अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. आता या चित्रपटाच्या निमित्तानं माधुरीच्या चाहत्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल! हेही वाचा

'रेस ३' चित्रपटापासून बॉबी देओलची नवी रेस!

प्रेमाची ५१ वर्षे...


संबंधित विषय
ताज्या बातम्या