• विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांनी दिली झेंड्याला मानवंदना
  • विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांनी दिली झेंड्याला मानवंदना
SHARE

परळ - परळ पूर्व येथील दादासाहेब फाळके मार्गावरील पालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयाच्या टेरेसवर सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती अध्यक्षा हेमांगी चेंबूरकर, नगरसेवक सुनील मोरे, परळ येथील जगन्नाथ भातनकर महापालिका शाळेतील विदयार्थी आणि शिक्षक तसंच पालिका कर्मचारी आणि सुरक्षारक्षक उपस्थित होते. परेड आणि सलामी देऊन झेंड्याला मानवंदना देण्यात आली.

जगन्नाथ भातनकर महापालिका शाळेतील विदयार्थीनी देशभक्तीपर गीतांनी झेंड्याला मानवंदना दिली. तर सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी संविधानबाबत माहिती देऊन उपस्थितांना संबोधित केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या