अमृतमहोत्सवानिमित्त ‘टाटा’मध्ये तीन दिवसीय परिषद

 BMC office building
अमृतमहोत्सवानिमित्त ‘टाटा’मध्ये तीन दिवसीय परिषद

परळ - टाटा मेमोरियल सेंटरच्या अमृतमहोत्सवानिमित्त पहिल्यांदाच ‘आरोग्य सेवा ते मानवाची मूलभूत गरज’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्य सेवेत सहजता आणि परवडणारे दर ही दोन महत्त्वाची आव्हाने सध्या सर्वांनाच भेडसावत आहेत. आपल्या देशातील स्थितीशी जुळवून छोट्या आणि मोठ्या प्रमाणावरील आरोग्यसेवा प्रणालीसाठी देशात स्वतःचे असे उपचार धोरण विकसित करावे लागेल. यासाठी सार्वत्रिक उपाययोजना ओळखाव्या लागतील. त्याचबरोबर धोरण नियोजनकार भागधारकांना सहभागी करण्याची गरज आहे. त्यासाठी 27 ते 29 जानेवारी या दरम्यान परिषदेचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली.

Loading Comments