Advertisement

का साजरा केला जातो 'ओणम'?


का साजरा केला जातो 'ओणम'?
SHARES

केरळमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणारा मल्याळी सण म्हणजेच ओणम. या सणाला शेतकऱ्यांचा सणही म्हणतात. खरेतर केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या उत्सवाने सुरू होतो. दरवर्षी अॉगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्यादरम्यान ओणम हा सण 10 दिवस साजरा केला जातो. या दिवसांत केरळमध्ये ठिकठिकाणी नद्या आणि तळ्यांमध्ये बोटींच्या शर्यती लागतात. या सणाचा पहिला दिवस हा गणेश चतुर्थीपासून सुरू होतो. या दिवशी केरळमध्ये प्रत्येक घरासमोर रंगीबेरंगी फुलांची रांगोळी काढली जाते.  



का साजरा केला जातो ओणम?

केरळवासीयांसाठी हा एक महत्त्वाचा सण मानला जातो. ज्या प्रकारे भारतात दिवाळी हा सण साजरा केला जातो त्याप्रमाणे केरळमध्ये ओणम हा सण साजरा होतो.

अशी आख्यायिका आहे की, महाबळी हा केरळचा प्रसिद्ध राजा होता. त्यांच्या राज्यात तिथली प्रजा अत्यंत सुखी होती. याच दरम्यान विष्णूदेवतेने वामन अवतार घेतला आणि बळीराजाकडे तीन पावले जमिनीची मागणी केली. बाळीराजानेही वामनाची विनंती मान्य केली. त्यामुळे त्यांच्या राज्याचे उद्धार झाले. असेही म्हटले जाते, वर्षातून एक दिवस बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी येतो. त्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ आणि स्वागतासाठी हा सण साजरा केला जातो.


बोटींची लागते शर्यत

केरळमध्ये दरवर्षी ओणमच्या निमित्ताने बोटींची स्पर्धा लागते. या स्पर्धेसाठी खास बोटी बनवल्या जातात. त्या खूप लांब आणि निमुळत्या असतात, एका बोटीत शंभर लोक बसतील इतकी त्याची क्षमता असते. याचसोबत कथकली नृत्यही सादर केले जातात. अशा प्रकारे 10 दिवसापर्यंत ओणम हा सण उत्साहात साजरा केला जातो.


लज्जतदार मेजवानी

सजावटीसह या सणाच्या दिवशी घराघरांत चविष्ट खाद्यपदार्थांची पंगत असते. सकाळी नाश्त्याला केळी उकडून खाल्ली जातात. त्याचबरोबर जेवणात पापड, खारा विविध प्रकारची लोणची, अप्पम, उन्नी अप्पम, चक्र पोंगल, दालवडा, पायसम, आमटी या लज्जतदार खाद्यपदार्थांचा बेत असतो.

केरळमध्ये ओणम हा सण 1960 पासून राज्यपातळीवर साजरा होऊ लागला. या दिवशी केरळमध्ये ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा प्रकाराचे देखील आयोजन केले जातात. 



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा