Advertisement

मंडपातील बाप्पांच्या आगमनाला सुरुवात


मंडपातील बाप्पांच्या आगमनाला सुरुवात
SHARES

मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळातील बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. यंदा 13 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून गणेशोत्सवाच्या तयारीलाही आता वेग आला आहे.


'या' मंडाळाच्या बाप्पांचं आगमन

19 ऑगस्टला रविवारचा मुहूर्त साधून मुंबईतील काही मंडळातील गणपती बाप्पांचं मंडपात आगमन झालं. काळाचौकीचा महागणपती, ग्रॅंटरोडचा राजा, कुंभारवाड्याचा राजा या तीन मंडळांनी ढोल ताशांच्या गजरात बाप्पांची मोठी मिरवणूक काढत वाजत गाजत बाप्पांना मंडळात आणले.

यावेळी मंडळाचे कर्यकर्ते, पदाधिकारी तसेच मुंबईकर मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावर्षी अनेक ठीकाणी रस्त्यावर मेट्रोची कामं सुरू आहे. रस्त्यावरील खड्डयांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यामुळे गणपती मिरवणुकीलाही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा