Advertisement

'होळी करा लहान, पोळी करा दान' उपक्रम सुपर हिट

'महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती'नं होळीची पोळी करा दान हा उपक्रम राबवला. याला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला.

'होळी करा लहान, पोळी करा दान' उपक्रम सुपर हिट
SHARES

आपल्याकडे होळीला पुरणाच्या पोळ्या करण्याची परंपरा आहे. घरात गोड धोड केलं जातं. 'होळीत दृष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा'...अशी त्यामागची कल्पना असते. याच भावनेनं होळीत पुरणपोळी अर्पण केली जाते. साधारण एका होळीत अंदाजे ५ ते १० पोळ्या अर्पण केल्या जातात. संपूर्ण महाराष्ट्रराज्याचा विचार केला तर अक्षरश: लाखो पुरणपोळ्या अग्नीच्या अधीन जातात. आजही २०% महाराष्ट्र अर्धपोटी झोपतो. किमान ते जाळून टाकण्याच्या एवजी कुणाच्या तरी मुखी गेलं तर?

'महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती'नं देखील हाच विचार करत 'होळीची पोळी दान करा' हा उपक्रम राबवला. या उपक्रमात मुंबईतील अनेक सोसायट्यांमधील लोकांनी स्वतःहून होळीत पोळी न टाकता त्या जमा केल्या आणि महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवल्या. या उपक्रमात महाराष्ट्र अंनिसच्या घाटकोपर शाखेतील सदस्यांनी घाटकोपर, दादर, वरळी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, बोरिवली, दहिसर, मीरा रोड, भाईंदर या ठिकाणाहून पोळ्या गोळा केल्या

मिळालेल्या पोळ्या दादर इथल्या आदिवासी कातकरी महिलांना, रे रोड पारधी वाडी, नायर रुग्णालय, टाटा हॉस्पिटल, करुणा हॉस्पिटल, भाईंदर, बोरिवली, दहिसर स्टेशनच्या बाहेर राहणाऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवल्या. या उपक्रमात दहिसर शाखेचा अगदी दोन वर्षाचा चिमुकला कार्यकर्ता विहान यानं सुद्धा पोळी वाटपात सहभाग घेतला


दहिसरची दहिवली सोसायटी, बोरिवलीची एलआयसी कॉलनी, मीरा रोडच्या सुंदरदर्शन, सुंदरनगर आणि सरस्वती धाम सोसायट्या, वरळीच्या बावन्न चाळ मधील कार्यकर्ते आणि आभा परिवर्तनवादी संघटना, योद्धा मित्र मंडळ यांनी वरळीतील मंडळासोबत एक घास आनंदाचा म्हणून पुरणपोळी गोळा करुन अंनिस कार्यकर्ते यांच्याकडे दिल्या. घाटकोपर भटवाडीतील दत्तकृपा मंडळ, बालमित्र मंडळ, संघर्ष मित्रमंडळ, अखंड हरिनाम सप्ताह मंडळ या मंडळांनी स्वतःहून पुढाकार घेऊन पोळ्या गोळा करून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवल्या.



हेही वाचा

वरळीत कोरोनासूर आणि हिंगणघाट आरोपीच्या प्रतिकृतीचं दहन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा