मोहरमनिमित्त सरबत वाटप

वांद्रे - मोहरमनिमित्त बुधवारी मुस्लीम बांधवांकडून वांद्रे रेल्वे स्टेशन, वांद्रे बस डेपो, वांद्रे बाजार रोड आणि माहीम परिसरात सरबत वाटप करण्यात आले. काही ठिकाणी तहानलेल्यांना सरबत देऊन त्यांची तहान भागवण्यात आली. तर काही ठिकाणी रोजा ठेवणाऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

आजच्याच दिवशी इमाम हुसेन करबला येथे शहीद झाले होते. त्यांना तीन दिवस पाण्याशिवाय तडफडवण्यात आले होते. त्याचीच आठवण म्हणून मोहरम दिवशी सरबत वाटप केले जाते.

मोहरमच्या दहावा दिवस अशोर म्हणून अोळखला जातो. या दिवशी प्रत्येक जण आपल्या एेपतीप्रमाणे सरबत आणि अन्नदानाची व्यवस्था करतो. तसेच मोहरमनिमित्त मुस्लिमांमधील शिया पंथीय मातम करतात. तर सुन्नी पंथीय मशिदीत जाऊन नमाज पढतात.

Loading Comments