आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांची दिवाळी

 Mumbai
आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांची दिवाळी
आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांची दिवाळी
See all

लालबाग - आधार युवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीनं सोमवारी जव्हार तालुक्यातील आदिवासी पाड्यामधील 3 शाळांमध्ये दिवाळीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. परळमधील गेल्या चार वर्षात ट्रस्टतर्फे अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात. यंदाची दिवाळी आदिवासी पाड्यामधील विद्यार्थ्यांसोबत साजरी करण्याचा ट्रस्टचा मानस होता, त्यानुसार जव्हार येथील चंद्रगाव, अनंतनगर, वाकिचामाळ या तीन शाळेमधील 160 विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना नवीन कपडे, फटाके आणि अनेक जीवनावश्यक वस्तू देऊन ट्रस्टने दिवाळी साजरी केली. त्याचबरोबर या विदयार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. या वेळी आधार युवा प्रतिष्ठानमधील सर्व पदाधिकारी आणि सदस्य मिळून एकूण 50 जण उपस्थित होते. त्याचबरोबर भारतीय संघातून खेळलेले आणि प्रो कब्बडीमध्ये प्रसिद्ध असलेले खेळाडू विशाल माने देखील या सामाजिक कामात सहभागी झाले.

Loading Comments