Advertisement

मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वरच केले बाप्पांचे विसर्जन


मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वरच केले बाप्पांचे विसर्जन
SHARES

शिवाजीपार्क येथील महापौर निवासस्थानातील कृत्रिम तलाव बंद करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या बाप्पांचे यंदा 'वर्षा' निवासस्थानीच विसर्जन करण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांचा गणपती विसर्जनासाठी महापौर निवासस्थानी आणण्याची प्रथा होती. परंतु यावर्षी ही प्रथा बंद करून टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'वर्षा' निवासस्थानीच कृत्रिम तलाव बनवून तेथे गणेश मूर्तीचे विसर्जन केले.



महापौर निवासातील कृत्रिम तलाव यंदा शेजारच्या क्रीडा भवनाच्या जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. तत्कालिन महापौर शुभा राऊळ यांनी कृत्रिम तलावांची संकल्पना मांडून महापौर निवासस्थानी कृत्रिम तलाव बांधण्यास पुढाकार घेतला होता.


मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानावरील गणपतीचे या तलावात विसर्जन व्हावे, अशी विनंती केल्यानंतर महापौर निवासात 'वर्षा'वरील गणेश मूर्तीच्या विसर्जनास सुरूवात झाली होती.

सर्वांनी इको फ्रेंडली पद्धतीनेच बाप्पाचे विसर्जन करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.


 


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा