Advertisement

मुंबईतील 'या' भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ

सध्या कोरोनाचं सावट मुंबईसह राज्यावर असल्यानं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईतील 'या' भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
SHARES

गणेशोत्सव आता अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला असून, सर्वत्र तयारीला सुरुवात झाली आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या बाप्पाचे आगमन ही केले आहे. मात्र सध्या कोरोनाचं सावट मुंबईसह राज्यावर असल्यानं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात मध्य मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून रुग्णवाढीचा आलेख वाढताना दिसत आहे. परळ, लालबाग, शिवडी, नायगाव, वडाळा हे भाग रुग्णवाढीत सगळ्यात वरच्या स्थानावर आहेत.

गणेशोत्सवात गजबजणाऱ्या या भागात उत्सवापूर्वीच रुग्णवाढीचे विघ्न येऊन ठेपले आहे. मध्य मुंबईपाठोपाठ भायखळ्यातही रुग्णवाढ दिसत आहे. एकीकडे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहत आहेत तर दुसरीकडे रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. मुंबईत निर्बंध शिथिल केल्यानंतर २० दिवसांतच दैनंदिन रुग्णसंख्येने जवळपास पाचशेचा आलेख पुन्हा गाठला आहे.

मुंबईत रविवारी ४९६ रुग्णांचे नव्याने निदान झाले. १२ जुलैनंतर प्रथमच मुंबईत इतक्या मोठया संख्येने रुग्णसंख्या वाढल्याचे आढळले आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवात नागरिकांनी जो संयम दाखवला तो यावर्षी दिसत नाही. लालबाग, परळ हा अस्सल मराठी लोकवस्तीचा भाग एरवीही गजबजलेला असतो. पण प्रत्यक्षात गणेशोत्सव सुरू होण्याआधीच या भागात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

गेल्या आठवड्यापासून महापालिकेचा ई विभाग हा रुग्णवाढीत पहिल्या क्रमांकावर आहे. या भागात गेल्या आठवड्यापासून दररोज १५ ते २० नव्या रुग्णांची भर पडत आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील बाधितांचे प्रमाण ०.८६ टक्के होते. तर ३११२ रुग्ण उपचाराधीन होते. परंतु सप्टेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात पुन्हा रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. बाधितांचे प्रमाण १.२१ टक्के झाले आहे. मुंबईत १० दिवसांतच ३,८४३ रुग्णवाढ झाली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा