डबेवाल्यांचा आदिवासींना मदतीचा हात

  Borivali
  डबेवाल्यांचा आदिवासींना मदतीचा हात
  मुंबई  -  

  बोरिवली - मुंबईचे डबेवाले आता कपडा बॅंक सुरू करणार आहेत. या कपडा बॅंकेतून पालघर जिल्ह्यातील आदिवासींना कपडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबईकरांनी आपले जुने कपडे डबेवाल्यांना द्यावेत, असे आवाहन डबेवाल्यांच्या संस्थेने केले आहे. हे जुने कपडे दिवाळीत पालघर, जव्हार, मोखाडा, तलासरी येथील आदिवासींना देण्यात येणार आहेत. आदिवासी आणि त्यांच्या मुलांना अंगभर कपडेही मिळत नाहीत. सणासुदीच्या काळात नवीन कपडे मिळणे तर दुरापास्त. त्यामुळे जुने किंवा वापरत नसलेले कपडे आदिवासींना दिल्यास त्यांना निदान अंगभर कपडे तरी मिळतील, असे डबेवाल्यांनी म्हटले आहे. कपडा बॅंकेला जुने कपडे देऊ इच्छिणाऱ्यांनी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सकाळी 8 ते 10 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 6 या वेळेत असलेल्या डबेवाल्यांच्या प्रतिनिधींशी 9867221310 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.