नववर्षानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

 Dadar
नववर्षानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
नववर्षानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
See all
Dadar , Mumbai  -  

प्रभादेवी- सालाबादाप्रमाणे यंदाही हिंदु नववर्षानिमित्त मुंबईचे अराध्य दैवत असलेल्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने व्हावी. सर्वांना बाप्पाचे शांततेत दर्शन व्हावे यासाठी मंदिर प्रशासनाने विशेष काळजी घेतल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले. यावेळी मुंबई शहर तसेच उपनगरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येने दर्शन घेतले. अनेक भाविकांनी यावेळी घर ते सिद्धिविनायक मंदिर असे अनवानी चालत येऊन दर्शन घेतल्याचे पहायला मिळाले. वृद्धांपासून तरुणांनीही मोठ्या प्रमाणात यावेळी दर्शन घेतले. यावेळी सिद्धिविनायक मंदीर परीसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त पहायला मिळाला. मंदिर प्रशासनाने वेळेत बदल केल्यामुळे लोकांना वेळेत दर्शन घेता आले.

Loading Comments