सायन कोळीवाड्यात शितलादेवीचा महोत्सव

 Sion Koliwada
सायन कोळीवाड्यात शितलादेवीचा महोत्सव

शीव - सायन कोळीवाड्यातील कोकरी आगर वर्धराजमध्ये शितला माता (मुत्तूमारीअम्मन) देवस्थान कमिटी तर्फे 54 व्या वार्षिक महोत्सवाचे आयोजन सोमवारपासून पासून करण्यात आले . शितला मातेचा अभिषेक करून तामिळ बांधवांनी पारंपारिक रितीप्रमाणे शंकराची विधिवत पूजा केली. 

तसंच भक्तांनी या वेळी देवीला हार-फुल अर्पण करुन पूजा केली. 11 मार्चपर्यंत हा महोत्सव असणार आहे. तसंच महोत्सवात पूजा आरती प्रसादाचे आयोजन शितला माता (मुत्तूमारीअम्मन) देवस्थान कमिटी तर्फे करण्यात आले होते.

Loading Comments