मुंबई - मुंबईतील सुकामेवा उद्योग दिवाळीच्या सिझनमध्ये दुपटीने उलाढाल करतो. सुमारे तीस ते चाळीस कोटींची उलाढाल दिवाळीत होते, असं ड्रायफ्रूट्सविक्रेते सांगतात. एक विक्रेते नरेश जैन यांनी सांगितलं की, दिवाळीत भेट देण्यासाठी आता अधिकाधिक जणांची पसंती ड्रायफ्रूटलाच असते
सुकामेवा उद्योगाच्या या प्रगतीमागे आरोग्यविषयक वाढलेली जाणीव आणि क्रयशक्ती आहे. या शिवाय सुकामेवा आता सर्रास उपलब्धही होतोय. सुबक पॅकिंग, दर्जातलं सातत्य आणि आरोग्याला होणारा फायदा यामुळं ड्रायफ्रूट्सना मिळणारी पसंती वाढल्याचं चित्र यंदाही दिसतंय.
बाजारपेठेतील ड्रायफ्रुट्सच्या किमती
| वस्तू | किंमत |
| बदाम | 850 रुपये प्रतिकिलो |
| खारे काजू | 1200 रुपये प्रतिकिलो |
| काजू | 1100 रुपये प्रतिकिलो |
| किसमीस | 250 रुपये प्रतिकिलो |
| अंजीर | 700 रुपये प्रतिकिलो |
| अकबरी पिस्ता | 1800 रुपये प्रतिकिलो |
| पिस्ता मगज | 1800 रुपये प्रतिकिलो |
| साधा पिस्ता | 1200 रुपये प्रतिकिलो |
| खारा पिस्ता | 1800 रुपये प्रतिकिलो |
| काजू फाडिया | 940 रुपये प्रतिकिलो |
| काजू टुकडा | 880 रुपये प्रतिकिलो |
| कगडी बदाम | 1800 रुपये प्रतिकिलो |
| मामरा बदाम | 420 रुपये प्रतिकिलो |
| अमेरिकन बदाम | 1200 रुपये प्रतिकिलो |
