बेस्टच्या प्रवाशांना बेस्ट गीफ्ट

 Pali Hill
बेस्टच्या प्रवाशांना बेस्ट गीफ्ट

मुंबई - दिवाळीच्या खेरदीसाठी दादर, वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी, एमपीएमसी मार्केट, वाशी या ठिकाणी नेहमीच गर्दी होते. त्यामुळे मुंबईकरांच्या सोयीसाठी बेस्ट या भागांत जादा गाड्या सोडते आहे. 28 आक्टोबरपर्यंत या जादा गाड्या धावतील.

दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी बेस्टच्या प्रवाशांची संख्या वाढते. ही बाब लक्षात घेत बेस्टनं भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबरला 133 जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगरं, मिरा रोड, भाईंदर, नेरूळ, एरोली, कॅडबरी जंक्शन, कोपरखैरणे, वाशी या मार्गांवर या जादा बसगाड्या धावतील माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.

Loading Comments