Advertisement

'जाहिरातींमुळं गर्दी होऊ नये' सरकारच्या नियमावलीमुळं गणेशोत्सव मंडळांची होणार आर्थिक कोंडी?


'जाहिरातींमुळं गर्दी होऊ नये' सरकारच्या नियमावलीमुळं गणेशोत्सव मंडळांची होणार आर्थिक कोंडी?
SHARES

राज्य सरकारनं गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या नियमावलीत जाहिरातींमुळं गर्दी आकर्षित होता कामा नये’ असे आदेश दिल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे संभ्रमात पडली आहेत. गेल्या वर्षी ऐन वेळी जाहिरातींना मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे यंदा सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मंडळांकडून होऊ लागली आहे.

सध्या वर्गणी आणि देणग्या बंद असल्यानं जाहिरातींच्या माध्यमातून मंडळांना आर्थिक मदत होऊ शकते. त्यामुळं जाहिरात झळकविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

अन्यथा यंदाही मंडळांचे आर्थिक गणित विस्कटण्याची चिन्हे आहेत. करोनाकाळात नागरिकांचे आर्थिक गणित बिघडल्याने वर्गणी आणि देणग्यांवर मर्यादा आली आहे. उत्सवासाठी निधी नसल्याने अनेक मंडळांतील कार्यकर्ते पदरमोड करून उत्सव साजरा करीत आहेत. अशा वेळी व्यावसायिक जाहिरातीमधून मंडळांना आर्थिक मदत मिळू शकते; परंतु राज्य सरकारच्या नियामवलीत ‘जाहिरातींच्या प्रदर्शनाने गर्दी जमणार नाही, असे पाहावे’ असा उल्लेख करण्यात आल्याने मंडळांचा गोंधळ उडाला आहे.

गतवर्षीही हीच नियमीवली होती. त्यानुसार मंडळांनी जाहिराती घेतल्या. परंतु नंतर पालिका प्रशासनाने जाहिराती झळकविण्यास मनाई के ली. ‘जाहिराती पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. त्यामुळे संसर्गाची भीती आहे’ अशी भूमिका पालिकेने मांडली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा