गणेशगल्ली साकारणार इकोफ्रेंडली सूर्यमंदिर


  • गणेशगल्ली साकारणार इकोफ्रेंडली सूर्यमंदिर
  • गणेशगल्ली साकारणार इकोफ्रेंडली सूर्यमंदिर
SHARE

गणेशोत्सव जवळ येऊ लागल्याने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांतील धावपळ वाढली आहे. कुठं ढोलताशा पथकाचा सराव सुरु आहे, तर कुठं मंडप उभारणीच्या कामाला वेग आला आहे. आशातच शुक्रवारी २७ जुलै रोजी गुरुपोर्णिमेचा मुहूर्त साधून लालबागच्या गणेशगल्लीतील 'लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'च्या बाप्पांचा पाद्य पूजन सोहळा झाला. यंदाच्या वर्षी मंडळाने प्लास्टिक बंदीला समर्थन देत पर्यावरणपूरक आरास साकारण्याचा निर्णय घेतला आहे.इकोफ्रेंडली सूर्यमंदिर

लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे ९० वं वर्ष आहे. १९२८ मधे या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे आकर्षक देखावे सादर करण्याची परंपरा कायम ठेवत यंदा मंडळ मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील सूर्य मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे. राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी घालण्यात आल्यामुळे आरास साकारण्यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यात येत आहे. ज्यामधे लाकूड, कापड, ज्युट, अशा वस्तूंचा समावेश आहे.२२ फूट उंच मूर्ती

दरवर्षी गुरूपोर्णिमेच्या दिवशीच बाप्पांचा पाद्य पूजन सोहळा होतो. पाद्यपूजन सोहळ्याची परंपरासुद्धा आमच्या मंडळाकडून सुरू करण्यात आली. ही परंपरा नंतर अनेक मंडळांनी स्वीकारली. सुरूवातीच्या काळात गणेश गल्लीतील बाप्पांच्या मूर्तीचा आकार लहानच होता. १९७७ मध्ये मंडळाने ५० वं वर्ष साजरं करताना पहिल्यांदा २२ फुटांची मूर्ती साकारली होती. तेव्हापासून उंच मूर्तीची परंपरा सुरू झाली. यंदाही २२ फुटांची गणेश मूर्ती साकारण्यात येणार आहे. मुंबईचा राजा म्हणून ख्याती असलेल्या आमच्या मंडळातील बाप्पांच्या दर्शनासाठी गणेशोत्सावादरम्यान दररोज अंदाजे १ लाख भाविक भेट देतात.
- किरण तावडे, अध्यक्ष, लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबईहेही वाचा-

बाप्पावरही जीएसटी, गणेशमूर्ती महागल्या!

बाप्पाला थर्माकोलची सजावट नाहीच! उच्च न्यायालयाकडून बंदी कायमसंबंधित विषय
ताज्या बातम्या