Advertisement

गणेशोत्सव २൦१९ : १२ फुटावर विराजमान 'फोर्टचा इच्छापूर्ती'

संपूर्ण मुंबईत सर्वाधिक मोठे देखावे साकारणारं एकमेव मंडळ म्हणजे फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. बाप्पा मुंबईचा या विशेष कार्यक्रमात आज आपण आलो आहोत फोर्टच्या इच्छापूर्तीच्या दर्शनाला.

SHARES

संपूर्ण मुंबईत सर्वाधिक मोठे देखावे साकारणारं एकमेव मंडळ म्हणजे फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळहे एकमेव मंडळ आहे ज्यांनी आतापर्यंत पंढरपूरचं विठ्ठल रूक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरची तुळजाभवानी, १२ ज्योर्तीलिंग, ११ मारूती, २१ गणपती यांसारख्या मोठ्या मंदिराचे देखावे साकारले आहेत. बाप्पा मुंबईचा या विशेष कार्यक्रमात आज आपण आलो आहोत फोर्टच्या इच्छापूर्तीच्या दर्शनाला.फोर्टच्या इच्छापूर्तीचा इतिहास

फोर्टचा इच्छापूर्ती हे गणेश मंडळ फोर्ट विभागातील सर्वात जुनं मंडळ आहे. या मंडळाची स्थापना १९५६ साली झाली. १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सामील झालेल्या मुंबईकरांनी एकत्र येऊन या गणपतीची स्थापना केली. सुरूवातीला या गणपतीला केवळ 'सार्वजनिक गणपती' या नावानं ओळखलं जात होतं. त्यानंतर काही भाविकांनी या गणपतीला 'फोर्टचा इच्छापूर्ती' हे नाव दिलं. तेव्हापासून हा गणपती 'फोर्टचा इच्छापूर्ती' या नावानं प्रसिद्ध झाला.


आगळावेगळा मंडप

फोर्टचा इच्छापूर्ती १२ फुट उंचीवर असतो. हायकोर्टाचे सर्व नियम पाळून श्रीगणेशाचा मंडप तयार केला जातो. फोर्टमध्ये नेहमी गर्दी असणारच हे ओळखून ट्रॅफिकला अडथळा न करता मंडपाची उभारणी केली जाते. खालून गाड्या जातात आणि वर मंडपात श्रीगणरायाची मूर्ती स्थापित केली जाते. म्हणून असा आगळावेगळा मंडप पाहण्यासाठी लोक आवर्जून येतात.


राजस्थानहून स्पेशल टीम

राजस्थानहून २५ जणांची टीम मंडप उभारण्यासाठी येते. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे काम पूर्ण केल्यानंतर थेट मुंबईत येतात आणि इच्छापूर्ती श्रीगणरायाचा मंडप तयार करतात. दरवर्षी या टीमकडून फक्त दोनच मंडप तयार केले जातात. या टीममध्ये जे कारागीर आहेत, ते ‘स्पेशालिस्ट ‘ आहेत. दोन्ही हातानी एकच नक्षीकाम करणारे हे कारागीर पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. उजवा हात आणि डावा हात एकाच वेळी चालवून अतिसुंदर रेखीव आणि देखीव नक्षीकाम करणारे हे कारागीर राजस्थानहून येतात आणि त्यांची खास अशी ओळख आहे.


नऊ फुटांची मूर्ती

मूर्तिकार अशोक म्हात्रे यांच्याकडून दरवर्षी नऊ फूट उंचीची श्री गणरायाची मूर्ती घडवली जाते आणि ही मूर्ती स्थापित केली जाते. या मूर्तीची प्रतिमा भक्तांच्या हृदयात कोरली गेली आहे. त्यामुळे या मूर्तीची जडणघडण आणि उंची बदलली जात नाही. दरवर्षी एकाच पद्धतीची, स्वरूपाची उंचीची आणि त्याच पोझमध्ये मूर्ती बसवली जाते.


आॅनलाइन दर्शन

सध्याच्या डिजिटल युगात कुठंही मागे पडू नये व भाविकांनी घरबसल्या गणपतीचं दर्शन घेता यावं यासाठी http://fortchaicchapurtiganesh.com/ हे वेबसाईटही मंडळानं सुरू केली आहे. यंदाच्या वर्षीपासून या वेबसाईटवर फोर्टच्या इच्छापूर्तीचं दर्शनही भाविकांना घेता येणार आहे.हेही वाचा

गणेशोत्सव २०१९ : सामाजिक एेक्य जपणारा 'उमरखाडीचा राजा'

गणेशोत्सव २०१९: बापाच्या विसर्जनाला नको घातक गुलाल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा