Advertisement

गणेशोत्सव २०१९: बापाच्या विसर्जनाला नको घातक गुलाल!

बाजारात उपलब्ध असलेला रासायनिक गुलाल आरोग्यास अपायकारक ठरत असल्याने हा घातक गुलाल उधळू नये, असा सल्ला पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे.

गणेशोत्सव २०१९: बापाच्या विसर्जनाला नको घातक गुलाल!
SHARES

बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गुलालाचा वापर केला जातो. मात्र बाजारात उपलब्ध असलेला रासायनिक गुलाल आरोग्यास अपायकारक ठरत असल्याने हा घातक गुलाल उधळू नये, असा सल्ला पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे. 

लाडक्या बाप्पाला निरोप देताना गुलालाची उधळण करणं हा आपल्या संस्कृतीचाच भाग मानला जातो. मात्र, गुलालात होत असलेली भेसळ आणि सध्या बाजारात असलेल्या रासायनिक गुलालामुळे गणेशभक्तांना अपाय होण्याची भीती व्यक्त होत आहे. पर्यावरणपूरक गुलाल खरेदी करण्यासाठी २० किलोचे पोतं खरेदी करावं लागतं आणि त्याचा दर ८०० रुपये आहे. तसंच, हा गुलाल खुल्या स्वरूपात (सुटा) विकला जात नसल्यामुळे त्याला मागणी कमी आहे.


त्याचवेळी, रासायनिक गुलालाचं २० किलोचं पोतं केवळ ३८० रुपयांना उपलब्ध आहे. सुट्या स्वरूपातही हा गुलाल मिळत असल्याने हा गुलाल विकत घेण्याकडे भाविकांचा कल वाढला आहे, अशी माहिती खुद्द गुलाल विक्रेत्यांनीच नाव न छापण्याच्या अटीवर दिली. नाशिक आणि जळगावहून विक्रीसाठी आलेला हा रासायनिक गुलाल सध्या मुंबईच्या नाक्यानाक्यावर विकला जात आहे.

पर्यावरणपूरक, शुद्ध गुलाल हा नैसर्गिक घटकांपासून तयार केला जातो. त्यासाठी पलाश, टीसफुले, हळद, बिल्वा वनस्पती, कुमकुम यांचा वापर होतो. या गुलालाचा रंग रासायनिक गुलालाच्या तुलनेत अधिक गडद असतो. यामुळे त्वचेला अपाय होत नाही आणि पाण्यात धुतल्यास हा गुलाल सहज निघतो. रासायनिक गुलाल फिकट रंगाचा असला तरी त्याला कृत्रिम चमक असते. या गुलालात लेड ऑक्साइड, कॉपर सल्फरसारखी विविध रसायने तसेच शिसे, आरारूट आदी घातक पदार्थ असतात. तर काही गुलालात संगमरव्हरी लाद्या कापताना पडलेला भुगाही वापरतात. हा गुलाल पाण्याने धुतल्यावर सहजासहजी जात नाही आणि नागरिकांच्या डोळ्यात गेल्यास अंपगत्व येण्याची भीती असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.



हेही वाचा-

१० मिनिटांत लालबागच्या राजाचं दर्शन, पावसामुळे गणेशभक्तांची गर्दी ओसरली

बाप्पाला निरोप देताय? भरतीच्या ‘या’ वेळा लक्षात ठेवा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा