१० मिनिटांत लालबागच्या राजाचं दर्शन, पावसामुळे गणेशभक्तांची गर्दी ओसरली

गणेशोत्सवाच्या काळात केवळ रात्रीच नव्हे, तर दिवसाही लालबाग, चिंचपोकळीचा परिसर गणेशभक्तांनी ओसंडून वाहत असतो. मात्र मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे इथली गर्दी ओसरली आहे.

SHARE

गणेशोत्सवाच्या काळात केवळ रात्रीच नव्हे, तर दिवसाही लालबाग, चिंचपोकळीचा परिसर गणेशभक्तांनी ओसंडून वाहत असतो. मात्र मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे इथली गर्दी ओसरली आहे. यामुळे एरवी लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी तासनतास रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना १० मिनिटांत राजाचं दर्शन मिळत आहे. 


गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत केवळ मुंबईच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक मुंबईत येऊन दाखल होतात. लालबाग आणि चिंचपोकळी परिसरात मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बाप्पा विराजमान होत असल्याने ११ दिवस भाविकांच्या गर्दीने हा परिसर फुलून गेलेला असतो.

गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, लालबागचा राजा, तेजुकाया, चिंचपोकळीचा चिंतामणी रंगारी बदक चाळ, काळाचौकीचा महागणपती अशा प्रसिद्ध गणरायाचं दर्शन घेण्यासाठी तसंच एकाहून एक असे सरस डेकोरेशन बघण्यासाठी इथं प्रचंड गर्दी होते. भाविक १४ ते १५ तास रांगेत उभे राहतात. मात्र पावसामुळे भाविक घराच्या बाहेर न पडल्याने या परिसरातील गर्दी पूर्णपणे ओसरली आहे. त्यामुळे अवघ्या १० ते १५ मिनिटांत उपस्थित भाविकांना येथील गणपतीचं दर्शन मिळू लागलं आहे.हेही वाचा-

बाप्पाला निरोप देताय? भरतीच्या ‘या’ वेळा लक्षात ठेवा

गणेशोत्सव २०१९: स्वामींच्या रुपातला सह्याद्री क्रीडा मंडळाचा बाप्पासंबंधित विषय
ताज्या बातम्या