• बाप्पाला निरोप देताय? भरतीच्या ‘या’ वेळा लक्षात ठेवा
SHARE

दीड दिवसांच्या गणपतीला निरोप देताना भरतीच्या वेळा लक्षात ठेवूनच पाण्यात उतरा असा सल्ला मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना दिला आहे. सोबतच मुंबई महापालिकेने देखील भरतीचं वेळापत्रक दिलं आहे.

मुंबई सध्या पाऊस पडत असून पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या काळात नद्या-नाले, तलाव आणि समुद्रातील पाण्याची पातळी वाढत असल्याने भाविकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. ३ सप्टेंबर रोजी मुंबईत दीड दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यात येईल. त्यानंतर ६ सप्टेंबरला ५  दिवसांचे गणपती, ७ सप्टेंबरला गौरी-गणपतींचं विसर्जन होईल, तर १२ सप्टेंबरला म्हणजेच अनंत चतुर्दशीला १०  दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होईल. गणेशोत्सवाच्या काळात आनंदाला गालबोट लागू नये आणि दुर्दैवी अपघात टाळावेत यासाठी मुंबई पोलिसांकडून हे आवाहन करण्यात आलं आहे.


या भरतीच्या वेळापत्रकानुसार दीड दिवसांप्रमाणेच पाचवा दिवस, सहावा दिवस, अकरावा दिवस आणि बाराव्या दिवशी येणाऱ्या भरतीची माहिती देखील देण्यात आली आहे. हेही वाचा-

गणेशोत्सव २०१९: स्वामींच्या रुपातला सह्याद्री क्रीडा मंडळाचा बाप्पा

गणेशोत्सव २०१९: बघा, रितेशने ‘असा’ बनवला इको फ्रेंडली बाप्पा!संबंधित विषय
ताज्या बातम्या