Advertisement

गणेशोत्सव २൦१९ : भारताबाहेरही गणपतीची पौराणिक रूपं

लोकदेवतांच्या विश्वातल्या अधिपतीनं सहजपणे भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडल्या. त्यानं धर्माची बंधनं कधीच जुगारली नाहीत. जिथे गेला तिथल्या संस्कृतीला आपला रंग देऊन त्यात रमला.

गणेशोत्सव २൦१९ : भारताबाहेरही गणपतीची पौराणिक रूपं
SHARES

गणेश मुळात एक लोकदेवता. भारतीय समाजमनात जन्मलेला, रुजलेला. सर्वच प्राचीन धर्म-परंपरांनी गणेशाचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अंगीकार केला. या धर्म-परंपरा जिथे गेल्या तिथे या गणेशाला बरोबर घेऊन गेल्या. लोकदेवतांच्या विश्वातल्या अधिपतीनं सहजपणे भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडल्या. जिथे गेला तिथल्या संस्कृतीला आपला रंग देऊन त्यात रमला.

भारतीय शिल्प किंवा चित्रकलेत गणेश एक अत्यंत महत्वपूर्ण आणि लोकप्रिय मूर्तीविषय आहे. गणपतीच्या नाना रूपांचे वर्णन जे पुराण आणि इतिहासात मिळते, ते भारतीय उपखंडात आणि भारताबाहेरही विविध रूपात अविष्कृत झाले आहे. गणेशाच्या विविध रूपातील अनेक मूर्ती आहेत. उभी असलेली, कुठे नृत्यरत, कुठे असुरवधकारी म्हणून, कुठे शिशु तर कुठे पूजक रूपातील गणपती दिसतात. आज आम्ही भारताबाहेरील गणपतीच्या विविध पौराणिक रूपांची ओळख करून देणार आहोत.


१) बौद्ध गणेश

साधारण ७ व्या किंवा ८ व्या शतकात मुख्य बौद्ध धार्मिक परंपरेत गणेश, विनायक नावानं गणेशाला स्थान मिळालं होतं. यातूनच पुढे बुद्धांच्या तंत्राचारात त्याचा शिरकाव झाला. बौद्ध तांत्रिक परंपरेत विनायकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. विशेषत: ज्या देशांमध्ये बौद्ध धर्माचा विस्तार आहे तिथेच गणपती पूजेची परंपरा आहे. चीन, नेपाळ, तिबेट या देशांमध्ये गणपतीला मानलं जातं. विनायक म्हणून गणपतीला ओळखलं जातंचीनमध्ये बौद्ध गणेशाचा प्रसार

भारतातील अजिंठ्याप्रमाणे चीनच्या तनुह-आंग इथल्या गुहेतील भिंतीवर गणपतीच्या मूर्ती आहेत. त्याच्या डोक्यावर पगडी आणि सलवार असं वस्त्र परिधान केलेलं आहे. अशा प्रकारे अन्य कुंग-हिसएनकेत गणेशाची गुहा-मंदिरे आहेत. या गुहा दीड हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. याशिवाय चीनमधील संग्रहालयात गणपतीचे चि‍त्रे सुरक्षित आहेत.


बौद्ध मठाचा रक्षणकर्ता

तिबेटी बौद्ध मठाच्या प्रवेशद्वारापाशी विनायक आणि महाकालाच्या प्रतिमा पाहायला मिळतात. मठाचा रक्षणकर्ता म्हणून तो ओळखला जातो. दुष्ट आत्म्यांच्या संकल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्या तिबेटी लोकांच्या स्थानिक बोन-पो धर्मामध्ये आणि तिबेटी बौद्ध धर्मामध्ये या दुरात्म्यांना विशेष स्थान आहे. त्यांपासून रक्षण करण्यासाठी ते मठामध्ये अनेक देवतांची आणि क्षेत्रपाळांची स्थापना करतात. गणपती हा त्यापैकीच एक आहे


नृत्य करणारा गणपती

बौद्ध गणेशाचा उल्लेख बौद्ध साधनमाला-ग्रंथात मिळतो. तो द्बादशभूज (बारहाती) आहे. त्याचे कपाळ रक्तपूर्ण असून हाती मांस असते. तिबेटी गणपतीही काही वेळा नृत्य करताना दिसतो. चक्रसंवर या तंत्राशी गणेशाचं हे रूप निगडीत आहे. याला तिबेटी भाषेत ‘त्सोग गी दाग पो मार चेन’ असे म्हणतात. अवलोकीतेश्‍वरापासून गणपतीच्या या रूपाची उत्पत्ती झाली असे मानले जातेगणेशोत्सव २०१९ : इथून ऑर्डर करा पर्यावरणपूरक गणपती२) हेरंब गणेश

हेरंब नाव देशीय प्राकृत शब्द हेरिम्बोपासून आलं आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय. हेरम्ब-गणपती तन्त्रसार- ग्रंथात उल्लेखित आहे.

पाच मुख, आठ हात 

आठ हात असलेली ही पंचमुखी गणेशमूर्ती दुर्मीळ अशीच आहेयामध्ये चार मुखं थेट समोरून पाहता येताततर पाचवे मुख मागच्या बाजूस आहे. शिवाय या गणेशमूर्तीतील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा गणेश दोन वाहनांवर आरूढ आहे. त्याच्या एका पायाखाली सिंह तर दुसऱ्याखाली उंदीर आहेही १५-१६ व्या शतकातील ब्राँझमधील ही गणेशमूर्ती आहे.


नेपाळमध्ये गणपती लोकप्रिय

सम्राट अशोकाची कन्या चारुमती हिनं नेपाळमध्ये गणेशाचं मंदिर बांधलं, अशी दंतकथा आहे. झिंपी ताडदू नावाच्या गावाजवळ गणेशाचे एक मंदिर आहे. दहाव्या शतकाच्या सुमारास भारताप्रमाणे नेपाळमध्ये गणेश देवता लोकप्रिय झाली आणि लोकांच्या देवघरात त्याला स्थान मिळालं. नेपाळमध्ये गणेशाच्या मूर्तीत हेरंब गणेशमूर्ती ही अत्यंत लोकप्रिय आहे. तसंच इथला नृत्यगणपती लाल रंगाचा आहे.


३) कांगीतेन गणेश

जपानमध्ये गणेशपूजा चीनमार्गे पोहोचली. जपानमध्ये गणेशाचा उल्लेख इ.. ८०६ मध्ये पहिल्यांदा झाल्याचं दिसून येतं. तज्ज्ञांच्या नुसार, कुकाई या बौद्ध धर्मगुरूच्या कालखंडात (.. ७७४ ते ८३५) गणेशाचं अस्तित्व प्रथम जपानमध्ये आढळून आलं.भाग्याची देवता

जपानमध्ये कांगीतेन, शोदेन आणि विनायक या नावानं गणेशाचा उल्लेख केला जातो. 'कांगीतेन' म्हणजे भाग्याची देवता आणि 'शोदेन' म्हणजे प्रथम देव! हिजोकीत सामान्यत: 'विनायक' शब्दाचा उपयोग केला जातो. जपानी गृह तंत्र धातु युगात वज्रधातु मंडळाचे स्थान ‍अतिशय महत्त्वाचं आहे. या मंडलाच्या रचनेत गणपतीची पाच रूप चित्रित केली आहेत.

) पूर्वेला : कोंगो-जाई-तेन (छत्र-विनायक)चं छत्र श्वेत रंगाचं आहे.

) दक्षिणेला : कोंगो-जिकी-तेन (माल्य-विनायक) यांच्या गळ्यात पुष्पमाळा आहे.

) पश्चिमेला : कोंगो-एतेनच्या (धनुर्विनायक) हातात धनुष्यबाण आहे

) उत्तरेला : जोबुकुतेनच्या (खडग विनायक) हातात खडग असून त्याचा वर्ण लाल रंगाचा आहे

) पाचवे कांगीतेनच्या (भाग्य-देवता) एका हातात लाडू आणि दुसऱ्या हातात मुळी आहे.हेही वाचा

गणेशोत्सव २०१९ : स्वराज्याची मुहर्तमेढ रोवणारा गणेश गल्लीचा राजा

गणेशोत्सव २०१९ : मुंबईत नवीन आहात? मग या '५' प्रसिद्ध गणेश मंडळांना नक्की भेट द्या
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा