गणेशोत्सवासाठी बेस्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांत एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्व नियम, कायदे पाळणाऱ्या आणि गेल्या दहा वर्षांत मंडळांविरोधात कोणतीही तक्रार नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना हा निर्णय दिलासा देणारा ठरला आहे. तसेच ते आगामी वर्षांसाठी अधिक चांगल्या योजना करू शकतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. यावेळी उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या निर्देशांकडेही लक्ष वेधण्यात आले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयानुसार सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींनी 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात पुढील पाच वर्षांसाठी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासकीय नियम व कायद्यांचे पालन करून परवानगी देण्याची कार्यवाही करायची आहे.
हेही वाचा