लालबागच्या राजाला इच्छापूर्ती असेही म्हटले जाते, कारण लालबागच्या राजाच्या दरबारात येणाऱ्या भाविकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, असे मानले जाते. त्यामुळे गणेशोत्सव काळात येथे भाविकांची मोठी गर्दी होते.
लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी भाविक गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजी साजरी होणार आहे. पण त्याआधी लालबागच्या राजाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविक आतुर झाले आहेत.
लालबागचा राजा चे प्रथम दर्शन ( प्रिंट व डिजिटल माध्यमांसाठी ) शुक्रवार दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे. सदरचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत YouTube चॅनलवर पहाता येईल.#lalbaugcharaja https://t.co/UuAoe9IZA1 pic.twitter.com/7kFl2WhMoq
— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) September 14, 2023
अशा परिस्थितीत, 15 सप्टेंबर 2023 रोजी भक्तांना लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. सायंकाळी ७ वाजल्यापासून भक्तांना गणपती बाप्पाचे पहिले रूप लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे पाहता येणार आहे.
उल्लेखनीय आहे की, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गेल्या ९० वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात.
हेही वाचा