Advertisement

दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर घरोघरी गैराईचे आगमन

शनिवारी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाले. या विसर्जनानंतर रविवारी मुंबईत अनेक ठिकाणी घरोघरी गौरींचे आगमन झाले.

दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर घरोघरी गैराईचे आगमन
SHARES

मुंबईसह राज्यभरात १० सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आगमन झालं. त्यानंतर शनिवारी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाले. या विसर्जनानंतर रविवारी मुंबईत अनेक ठिकाणी घरोघरी गौरींचे आगमन झाले. लक्ष्मीच्या पावलांनी येणाऱ्या गौरीच्या स्वागतासाठी घरोघरी फराळ, मिठाई यांची तयारी सुरू झाली होती.

भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रात घरांमध्ये गौरींचे आगमन होते. गौराईला सजविण्यासाठी नऊवारी, पैठणी तसेच विविध दागिने यांची घरोघरी तयारी सुरू झाली. गणपती बाप्पा नंतर तीन दिवसांनी गौराईचे आगमन झाल्याने घरोघरी आनंद द्विगुणित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गौरी पूजनाच्या दिवशी अनेक घरांमध्ये विविध पूजाविधी करण्यात येतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी शेजारी भाविकांना बोलावून जेवणाचा कार्यक्रमही करण्यात येतो. गौरी पूजनाच्या दिवसाची तयारी करण्यासाठी रविवारी संध्याकाळच्या वेळेस अनेक बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी जमली होती.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा