Advertisement

गरब्यासाठी दोन दिवस रात्री बारापर्यंत परवानगी

राज्यात नवरात्रीत दोन दिवस रात्री बारापर्यंत गरबा व दांडियास परवानगी देण्यात आली आहे.

गरब्यासाठी दोन दिवस रात्री बारापर्यंत परवानगी
SHARES

राज्यात नवरात्रीत दोन दिवस रात्री बारापर्यंत गरबा व दांडियास परवानगी देण्यात आली आहे. नवरात्रीत आणखी एक दिवस रात्री बारापर्यंत परवानगी द्यावी, याबाबत गृहखात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. मुख्यमंत्री शिदे लवकरच त्यावर निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

करोना काळानंतर दोन वर्षांनी यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय नवरात्रौत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गरबा व दांडियासाठी रात्री दहापर्यंत असलेली वेळ रात्री बारापर्यंत वाढवून देण्याची मागणी राज्यातील जनतेकडून व राजकीय कार्यकर्त्यांकडूनही होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि ध्वनिप्रदूषण कायद्यातील तरतुदींनुसार गरब्याची वेळ व ध्वनिवर्धकांचा वापर यावर मर्यादा आहेत.

नवरात्रीतही रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकांचा वापर करून गरबा खेळण्याची परवानगी हवी, अशी राज्यातील नवरात्री मंडळांची मागणी आहे. त्यामुळे आणखी एक दिवस वेळ वाढवून देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जात आहेत. दहीहंडी आणि गणेशोत्सवातील सर्व कोरोना निर्बंध उठवण्यात आले आहेत. हे पाहता आता नवरात्रोत्सवाची (Navratri 2022) जोरदार तयारी सुरू आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नवरात्रीच्या सर्व दिवसांत मध्यरात्रीपर्यंत गरबा आणि दांडिया खेळण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.

विधानसभेचे सदस्य प्रकाश सुर्वे सांगतात की, दोन वर्षांच्या कालावधीनंतर नवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरे केले जाणार आहे. 20 वर्षांपासून शहरातील सर्वात मोठ्या नवरात्रोत्सवाचे आयोजन करणाऱ्या सुर्वे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील लोकांना उत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांत मध्यरात्रीपर्यंत गरबा आणि दांडिया खेळण्यास सांगितले आहे. पण संपूर्ण नऊ दिवस मध्यरात्रीपर्यंत गरबा सुरू ठेवण्याची परवानगी मागितली आहे.



हेही वाचा

भाजपचा यंदा मुंबईत 300 ठिकाणी "मराठी दांडिया’

नऊ दिवस मध्यरात्रीपर्यंत गरबा, दांडिया खेळण्यास परवानगी द्यावी : प्रकाश सुर्वे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा