Advertisement

भाजपचा यंदा मुंबईत 300 ठिकाणी "मराठी दांडिया’

मुंबई महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

भाजपचा यंदा मुंबईत 300 ठिकाणी "मराठी दांडिया’
SHARES

मुंबई महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी यंदा नवरात्रात खास "मराठी दांडिया’चे आयोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठी दांडिया या नावाने प्रथमच भाजपने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गरबा-दांडिया हा सांस्कृतिक उत्सव गुजराती समाजात लोकप्रिय आहे. असे असले तरी गुजराती बांधवांव्यतिरिक्त इतर भाषिक समूहांत देखील हा उत्सव तितकाच लोकप्रिय आहे. उत्तर भारतीयांपासून मुंबईतील सर्व समाजबांधव नवरात्रोत्सवादरम्यान गरब्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असतात.

नेमकी हीच संधी हेरून भाजपने त्याचा राजकीय फायदा उठवण्याची रणनीती आखली आहे. मुंबईतील मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या भागात मराठी दांडिया या नावाने पुढील काही दिवस कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. मुंबईत काळा चौकी या ठिकाणी हा मराठी दांडिया रंगणार आहे.

काळाचौकी येथील अभ्युदयनगरमध्ये असलेल्या शहिद भगतसिंह मैदानात हा मराठी दांडिया महोत्सव ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान रोज संध्याकाळी आयोजित केला जाणार आहे. गायक संगीतकार अवधूत गुप्ते हे या दांडिया महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे.

हा दांडिया महोत्सव नि:शुल्क असणार असून दर दिवशी चौदा ते पंधरा हजार बांधव महोत्सवात सहभागी होतील. महोत्सवाची प्रवेशिका भाजपाच्या स्थानिक कार्यालयात उपलब्ध असेल; अशी माहिती भाजप मुंबई उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली.

आता पुन्हा एकदा भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सरकार आहे. त्यामुळे ही सणांभोवती असलेली चौकट मोडून जल्लोषात आम्ही ‘दांडिया महोत्सव’ आयोजित करत आहोत. मला विश्वास आहे की, आपले सरकार रात्री बारा वाजेपर्यंत दांडिया खेळण्यासाठी परवानगी देईल. जेणेकरून महोत्सवाचा आनंदही द्विगुणीत होईल, असे भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.हेही वाचा

नऊ दिवस मध्यरात्रीपर्यंत गरबा, दांडिया खेळण्यास परवानगी द्यावी : प्रकाश सुर्वे

फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा