Advertisement

जाणून घ्या तुळशी विवाहाचं महत्त्व

तुळशीच्या रोपाची घरात रुजवणी केल्यानंतर सुमारे ३ वर्षांनी तिचा विवाह करण्याची पद्धत आहे. यानंतर तुळशीच्या विवाहादिवशी तुळशीला नववधूप्रमाणे सजवलं जातं. तुळशी विवाहामध्ये वधूच्या रूपात तुळशीला सजवून तिचा विवाह लावला जातो.

जाणून घ्या तुळशी विवाहाचं महत्त्व
SHARES

दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नाची धामधूम सुरू होते. कार्तिकी एकादशीनंतर म्हणजेच द्वादशीच्या मुहूर्तावर तुळशीचा विवाह संपन्न होतो. तुळशीच्या विवाहानंतर लग्नाच्या मुहूर्तांनादेखील सुरुवात होते. यंदा तुळशी विवाह सोहळा मंगळवार, २० नोव्हेंबर २०१८ या दिवशी आहे.


तुळशी विवाह मुहूर्त

द्वादशी तिथी आरंभ : १९ नोव्हेंबर २०१८, दुपारी २.२९ वाजल्यापासून
द्वादशी तिथी समाप्ती : २० नोव्हेंबर २०१८, संध्याकाळी ५.१० मिनिटांपर्यंत


तुळशी विवाहाचं महत्त्व

कार्तिकी द्वादशीच्या मुहूर्तावर तुळस आणि विष्णूचा विवाह झाल्याती आख्यायिका आहे. द्वादशीपासून पुढील ५ दिवस हा सोहळा केला जातो. घरामध्ये किमान तुळशीचं रोप असणं आवश्यक आहे. तुळस वातावरणातील अशुद्ध घटक दूर करून ताजा प्राणवायू पुरवते. यामुळे घरात शुद्ध आणि प्रसन्न वातावरण निर्माण होण्यास मदत होते.


'असा' करतात तुळशी विवाह

तुळशीच्या रोपाची घरात रुजवणी केल्यानंतर सुमारे ३ वर्षांनी तिचा विवाह करण्याची पद्धत आहे. यानंतर तुळशीच्या विवाहादिवशी तुळशीला नववधूप्रमाणे सजवलं जातं. तुळशी विवाहामध्ये वधूच्या रूपात तुळशीला सजवून तिचा विवाह लावला जातो. याकरिता तुळशीला वधूप्रमाणे सोळा श्रृगारांनी सजवलं जातं. आवळा, चिंच, बोरं, उसाची दांडी, हळकुंड आणि हिरव्या बांगड्या ठेवल्या जातात. घरात शाळीग्राम दगड असल्यास त्याच्यासोबत किंवा घरातील किशोरवयीन मुलासोबत मंगलाष्टकाच्या घोषात विवाह संपन्न होतो. यानंतर घरात गोडाधोडाच्या पदार्थाचे वाटप केलं जातं.



हेही वाचा

घरातील वस्तू वापरून अशी रेखाटा सुरेख रांगोळी

मिठाई खाताय? मग 'असा' ओळखा मिठायांवरील भेसळयुक्त चांदीचा वर्ख



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा