SHARE

गोरेगाव - गोरेगाव पूर्व आरे रोडवर वसलेल्या अंबाबाई मातेच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक येतात. या मंदिराची स्थापना 1888 साली करण्यात आली होती. गोरेगावात ब्रिटीशकालीन तळे होते, त्यात अंबाबाई आणि शितला देवीची मूर्ती सापडली होती. त्यानंतर तिथे मंदिर बांधण्यात आले. मंदिराचे बांधकाम आनंद देसाई यांनी केले. या मंदिरात नवरात्रोत्सव पारंपारिक पध्दतीत साजरा केली जातो. मंदिरात ११ दिवस पुजा,भजन ,जागर ,कुमारी पुजन,हवन,किर्तन,मंत्रपुष्प,सूर संगित आणि घागरी फुंकणे या सारखे वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. 128 वर्षांपासून अंबाबाई येथे वास्तव करत असल्याचं जितेंद्र भटजी यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या