Advertisement

साठ्ये महाविद्यालयात 'जाणीव' महोत्सव


साठ्ये महाविद्यालयात 'जाणीव' महोत्सव
SHARES

विले पार्ले - साठ्ये महाविद्यालयात एन.एस.एस. युनिटनं जाणीव महोत्सव आयोजित केलाय. गेल्या 10 वर्षांपासून हा सामाजिक महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. या सोहळ्याचे उद्घाटन स्त्री चळवळीच्या संस्थापिका मंगला पाध्ये यांच्याहस्ते करण्यात आलं. उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्राध्यापक बिडवे सर, साठ्ये महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कविता रेगे, कार्यक्रम प्रमुख सहाय्यक विनोद गवारे उपस्थित होते. यावेळी मंगला पाध्ये यांनी स्त्री-पुरुष समानता या विषयावर भाष्य केलं. 1 वाजल्यापासून पोस्टर मेकिंग स्पर्धेला सुरुवात झाली. विविध 50 महाविद्यालयातील मुलांनी यात सहभाग घेतला होता. यावेळी लिंग समानता या विषयावर पोस्टर बनवण्यात आलं. आपल्या कलेतून सामाजिक भावना जपणारे नितीन यादव या स्पर्धेला परिक्षक म्हणून लाभलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा