Advertisement

दिंडोशीत दुमदुमला ज्ञानोबा तुकाराम गजर


दिंडोशीत दुमदुमला ज्ञानोबा तुकाराम गजर
SHARES

दिंडोशी - कार्तिकी एकादशी निमित्त ज्ञानोबा माऊलींच्या पालखीची मिरवणूक गुरुवारी संध्याकाळी काढण्यात आली. हा सोहळा दिंडोशी क्रांतीनगर परिसरातल्या नॅशनल चाळ इथं आयोजित करण्यात आला होता. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा प्रथम भोई होण्याचा मान स्थानिक आमदार सुनील प्रभू यांना दिला.

या वेळी उपविभाग प्रमुख विष्णु सावंत, शाखा प्रमुख प्रदीप निकम, भारतीय विद्यार्थी सेना विभाग तीनचे निमंत्रक विजय गावडे, युवासेना उपविभाग अधिकारी अमोल पालेकर, उपशाखा प्रमुख रमेश कळंबे, शरद केदारे आणि वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement