रंगतदार महाराष्ट्र उत्सव

 Ravindra Natya Mandir
रंगतदार महाराष्ट्र उत्सव
रंगतदार महाराष्ट्र उत्सव
रंगतदार महाराष्ट्र उत्सव
रंगतदार महाराष्ट्र उत्सव
See all

प्रभादेवी - मराठी मातीशी नातं सांगणाऱ्या विविध कलांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी. तसंच वार्षिक अभ्यासक्रमाबरोबरच त्यांच्यातील कलागुणांनाही वाव मिळावा या हेतूनं पर्णिका या संस्थेनं महाराष्ट्र उत्सवचं आयोजन रवींद्र नाट्य मंदिरात केलंय. हा उत्सव 19 डिसेंबरपर्यंत आहे. महाराष्ट्र उत्सवच्या निमित्तानं अनेक स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलंय. त्यामध्ये विविध पथनाट्य, गायन, कथाकथन, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा आहेत. रविवारी या उत्सवात एक मराठी शब्द घेऊन त्यावर तब्बल 1 मिनिट फक्त मराठी भाषेत बोलण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत प्रमुख पाहूणे म्हणून ‘मुंबई लाइव्ह’चे ज्येष्ठ पत्रकार मनोज कुळकर्णी यांनी उपस्थिती लावली. तर मुंबई शहरातल्या विविध महाविद्यालयाच्या तब्बल 60 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रामनारायण रुईया महाविद्यालयाची विद्यार्थिनी क्रांती कानेटकर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

Loading Comments