Advertisement

'अशा' रितीनं एका दिवसानं पुढे जाते संक्रांत

गेल्या काही वर्षांपासून ही मकर संक्रांती १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरी केली जात आहे. ९०० वर्षांपूर्वी संक्रांत १ जानेवारीला साजरी व्हायची. मकर संक्रांतीच्या तारखा बदलतात का? याबद्दल सरविस्तर वाचा

'अशा' रितीनं एका दिवसानं पुढे जाते संक्रांत
SHARES

२०२० या वर्षी मकर संक्रांत हा उत्सव १५ जानेवारीला साजरा केला जाईल. १४ जानेवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास सूर्य धनु राषीतून मकर राशीत प्रवेश करेल. म्हणूनच, १५ जानेवारीला हा उत्सव सूर्योदय, स्नान, दान आणि पूजा करून साजरा केला जाईल.

परंतु गेल्या काही वर्षांपासून ही मकर संक्रांती १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरी केली जात आहे. मकर संक्रांतीच्या तारखा सूर्याच्या हालचालीनुसार बदलतात. काही वर्षांनंतर हा उत्सव १४ नव्हे तर १५ आणि १६ जानेवारी रोजी साजरा केला जाईल.


मकर संक्रांतीचा इतिहास

काशी हिंदू विश्व विद्यालयाच्या ज्योतिषाचार्य पान गणेश मिश्रा यांच्या मते, मकर संक्रांत हा उत्सव राजा हर्षवर्धनच्या काळात २४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला होता. मुघल बादशहा अकबरच्या कारकिर्दीत १० जानेवारीला  मकर संक्रांती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा उत्सव ११ जानेवारीला साजरा करण्यात आला.

१८ व्या शतकात १२ आणि १३ जानेवारी रोजी हा सण साजरा करण्यात येत होता. एकदाच म्हणजे १९०२ साली १ जानेवारीला हा उत्सव साजरा केला गेला होता. यापूर्वी १९६४ साली मकर संक्रांती १५ जानेवारी रोजी प्रथमच साजरी करण्यात आली. यानंतर प्रत्येक तिन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी १४ जानेवारी आणि चौथ्या वर्षी १५ जानेवारीला मकर संक्रांत येते. त्यानुसार मकर संक्रांती २०७७ साली १४ जानेवारीला साजरी केली जाईल.


१५ जानेवारी का?

सुर्याचं धनु राषीतून मकर राषीत प्रवेश करण्याला मकर संक्रांती म्हटली जाते. वास्तविक, दरवर्षी सूर्य २० मिनिटं उशीरानं धनुतून मकर राशीत प्रवेश करतो. अशाप्रकारे, सूर्य दर तीन वर्षांनी एका तास इशीरानं मकर राशीत प्रवेश करतो आणि दर ७२ वर्षांनी एका दिवसानंतर. यानुसार, 2077 नंतर मकर संक्रांती १५ जानेवारी रोजी साजरी केली जाईल.


फेब्रुवारीत होणार संक्रांती साजरी?

ज्योतिषांच्या मते सूर्याच्या हालचालींवरून असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, ५००० वर्षांनंतर फेब्रुवारीच्या शेवटी मकरसंक्रांती साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रीय अंदाजानुसार, दरवर्षी सूर्याची गती २० सेकंदानं वाढत असते. त्यानुसार १००० वर्षांपूर्वी १ जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली गेली.मकर संक्रांतीचे महत्त्व जाणून घ्यायचंय? मग, हे ५ मुद्दे नक्की वाचा

संबंधित विषय
Advertisement