गणेशोत्सव २०१९: सार्वजनिक मंडळांत 'तंबाखू मुक्त जीवना'चा संदेश


SHARE

यंदाच्या गणेशोत्सवातून मुंबईकरांना तंबाखू मूक्त जीवनाचा संदेश देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं १४ हजार गणेश मंडळांमध्ये एक पत्रकं जारी केलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील गणेश मंडळ तंबाखूपासून मुक्त रहावे या उद्देशानं 'सलाम बॉम्बे फाउंडेशन' या संस्थेसोबत गणेसोत्सव समितीनं हा उपक्रम राबवला आहे. तसंच, तंबाखू विरोधात एक मोहिम सुरू करण्यात येणार आहे. 

तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना २०१०मध्ये गणेशोत्सवादरम्यान तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती टाळण्यास सांगितल्या होत्या. त्यानंतर मंडळांत तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती लागायच्या नाही. मात्र, २०११ मध्ये महापालिकेनं जवळपास १२ हजार मंडळांना लायसंस देऊन सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ कायद्याचे (COTPA) नियम लागू करण्यात आले. 

सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी १० दिवसाच्या गणेशोत्सवाच्या काळात तंबाखूजन्य पदार्थ टाळण्याचे संदेश देण्याचं आवाहन केलं आहेहेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: गणेशोत्सवात सामाजिक भान राखण्याचं महापालिकेचं आवाहन

७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मुंबई दौरासंबंधित विषय
ताज्या बातम्या

गणेशोत्सव २०१९: सार्वजनिक मंडळांत 'तंबाखू मुक्त जीवना'चा संदेश
00:00
00:00