Advertisement

गणेशोत्सव २०१९: गणेशोत्सवात सामाजिक भान राखण्याचं महापालिकेचं आवाहन

या गणेशोत्सवाचं पावित्र्य जपत मुंबईकरांनी सामाजिक भान राखत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करवा, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

गणेशोत्सव २०१९: गणेशोत्सवात सामाजिक भान राखण्याचं महापालिकेचं आवाहन
SHARES

सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आता घराघरांमध्ये आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विराजमान झाला आहे. बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात केलं असून, संपुर्ण मुंबापूरी गणेशोत्सवात रंगली आहे. बाजारपेठा कंटी, मोदक हार, मोदक, फूल यांनी सजली आहे. तसंच गणेशभक्तांनी खरेदी करीता प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या गणेशोत्सवाचं पावित्र्य जपत मुंबईकरांनी सामाजिक भान राखत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करवा, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

स्वच्छता राखण्याचं आवाहन

सार्वजनिक आरोग्याबाबत प्रत्येकानं आपल्या विभागातील उंदीर, डास होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यामुळं साथीच्या रोगांचा फैलाव होणार नाही. गणेशोत्सवात स्वच्छता राखण्यासाठी मोकळ्या जागेवरील माती, कचरा काढून घेण्याची काळजी घ्यावी. प्रत्येक मंडळानं कचरा साठविण्याची व्यवस्था वेगळी करावी. मंडपाच्या बाजूचा परिसर, रस्ते, विसर्जनाची ठिकाणं स्वच्छ ठेवावी. वाहतूक, पादचारी व इतरांन त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मंडळाच्या ठिकाणी ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.

पत्रकं प्रदर्शित करावी

महापालिकेनं तयार केलेली लोकोपयोगी भित्तीपत्रकंकापडी फलक आणि समाजोपयोगी माहितीपत्रकं मंडळाच्या परिसरात प्रदर्शित करावी. आग शमविण्याचं साहित्य सहज उपलब्ध होईल, अशा रीतीनं ठेवावी. उत्सवाच्या काळात मावा आणि माव्यापासून पदार्थ बनविले जातात. हे पदार्थ शिळे असतील तर तपासूनच खरेदी करावेत. गणेशोत्सवात मंडप परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले खाद्यपदार्थांची विक्री करतात त्यांना प्रतिबंध करावे, असंही आवाहन महापालिकेनं केलं आहे.



हेही वाचा -

मुंबईत जोरदार पावसाची हजेरी

७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मुंबई दौरा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा