बच्चेकंपनीसाठी मेट्रो सफर केवळ 5 रुपयांत

 Pali Hill
बच्चेकंपनीसाठी मेट्रो सफर केवळ 5 रुपयांत

मुंबई - मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजेच एमएमओपीएलनं बच्चेकंपनीला बालदिनाची विशेष भेट दिलीय. 12 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना मेट्रोतून केवळ पाच रुपयांत प्रवास करता येणाराय. पण ही सवलतीची सफर केवळ शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीच करता येणाराय. याशिवाय एक आँनलाइन कॉन्टेस्ट घेण्यात येणाराय. यातील विजेत्यांना किडझेनियाचे फ्री पासेस देण्यात येणारायेत. गतीमंद मुलांसाठी 12 नोव्हेंबरला एमएमओपीएलकडून मेट्रो जॉयराईड आयोजित करण्यात आलीय.

Loading Comments