रात्र उरुसची मदनपुरात समाप्ती

 Mazagaon
रात्र उरुसची मदनपुरात समाप्ती
रात्र उरुसची मदनपुरात समाप्ती
See all

भायखळा - मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त सोमवारी रात्री भायखळा स्थानकापासून ते मदनपुरापर्यंत उरुस काढण्यात आला. मुळात भायखळा, जे. जे. रुग्णालय, क्रॉफर्ड मार्केट, सीएसटी आणि आझाद मैदान इथून मार्गक्रमण करणाऱ्या ऊरुस रॅलीनं आझाद मैदान इथं न जाता भायखळा ते क्रॉफर्ड मार्केट असा प्रवास केला. त्या शिवाय लहान लहान अशा अंदाजे 15 हून अधिक उरुस रॅलींनी क्रॉफर्ड मार्केटला भेट दिली. तर काही रॅली या मुंबादेवी रोड वरूनच मागे परतल्या, त्याशिवाय हजरत शाह कादरी मोहम्मद पैगंबरांच्या नामाचा जल्लोष संपूर्ण मोहम्मद अलीरोडवर होता. यामध्ये अंदाजे 5 हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

Loading Comments