Advertisement

आदर स्त्रीशक्तीचा : आदिवासींच्या प्रगतीसाठी लढणारी 'नवदुर्गा'

स्त्रीशक्तीचा जागर म्हणून नवरात्रोत्सव साजरा होतो. आदिशक्ती म्हणून स्त्रीशक्तीचा गौरव केला जातो. नवरात्रोत्सवानिमित्त 'मुंबई लाईव्ह' यंदा अशाच नवदुर्गांच्यां कार्याला सलाम करत आहे. आम्ही अशाच नवदुर्गांची ओळख तुम्हाला करून देणार आहे.

आदर स्त्रीशक्तीचा : आदिवासींच्या प्रगतीसाठी लढणारी 'नवदुर्गा'
SHARES

गरज ही शोधाची जननी असते. समाजात अशा अनेकांच्या अनेक अपूर्ण गरजांच्या जाणिवेतून मोठमोठी समाजकार्य उभी राहिलेली याआधीही अनेकदा आपण पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत. स्त्री-शक्तीने तर कित्येकदा एकत्र येऊन आपल्याच माताभगिनींच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांपासून-शिक्षण-नोकरी, व्यवसाय देत त्यांना स्वयंसिद्ध केले आहे. असेच काहिसे काम डहाणू इथं राहणाऱ्या मानसी गवादे यांनी केले आहे.

आदिवासींना दिलं हक्काचं व्यासपीठ

गरिबीचे चटके सहन करत तावूनसुलाखून निघालेल्या, बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करून कुटुंबाला हातभार लावत उच्च शिक्षण घेतलेल्या, एकाच वेळी पत्नी, सून, आई, मैत्रीण अशी विविध नाती जपत मानसी गवादे यांनी आपले सामाजिक कार्य देखील पार पाडले.

 

मानसी गवादे या तलासरीत राहतात. या समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं याच भावनेने त्या आदिवासी समाजाच्या हितासाठी मैदानात उतरल्या.

तसे कलेचे आदिवासी जमातीशी असलेले घनिष्ट नाते वारली चित्रकलेतून दिसून येते. या समाजाने परंपरेने लाभलेली ही कला जतन केली आहे. या कलेच्या माध्यमातून आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करण्याचे काम मानसी यांनी केले आहे.

आदिवासी तरुण-तरुणींना त्यांची कला सादर करण्यासाठी आणि त्या कलेच्या माध्यमातूनच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मंजिरी आर्ट अँड कल्चर फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून डहाणूतील वारली कलाकारांना त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.

समाजासाठी काही तरी करण्याची इच्छाच मला समाजकार्यासाठी प्रेरणा देते. २०१५ मध्ये माझे पती हितेंद्र गवादे यांच्या विचारातूनच या संस्थेची स्थापना झाली. सोसायटी आणि ट्रस्टच्या माध्यमातून आमचं रजिस्ट्रेशन झालं

- मानसी गवादे


संस्ठेमार्फत रोजगार निर्मिती

मानसी गवादे यांच्या मंजिरी आर्ट अँड कल्चरच्या मदतीने अनेकांना हक्काचं व्यासपीठ तर मिळालंच. पण यासोबतच त्यांना रोजगार उपलब्ध झाला.

भविष्यात जर कॉर्पोरेट कंपन्यांची साथ आम्हाला मिळाली तर त्यांची कला आणि वस्तू मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मानसी यांनी व्यक्त केला.

फक्त एवढेच नाही तर संस्थेतर्फे बऱ्याच आदिवासी मुलांसाठी कार्यशाळा, सेमिनार आणि फेस्टिव्हल घेतले जातात. मानसी स्वत: या मुलांना पेंटिंगच्या ट्रिक्स, क्राफ्ट, कल्चर याचे धडे देतात.

आदिवासींच्या विकासासाठी प्रयत्नशील

सुरुवातीला आदिवासींसाठी काम करता करता मानसी यांना जाणवलं की, आदिवासी समाज थोडासा संकूचित असतो. कला ही त्यांच्या रक्तातच आहे. पण सामाजापुढे हीच कला सादर करताना त्यांच्या मनात भिती असते. त्यामुळे त्यांच्या मनातील भिती घालवून आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मानसी बरेच सेमिनार घेतात.

सेमिनारमध्ये आदिवासी तरुणांना आपली कला कशी सादर करायची?, दुसऱ्यांशी कशा संवाद साधायचा? याचे मार्गदर्शन देखील दिले जाते. एकूणच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या सर्वांगिण विकासावर देखीन मानसी आणि त्यांची टीम भर देते.

आदिवासी फक्त मी पुस्तकात वाचून होते. मला त्यांची भाषा, वेशभूषा, खान-पान हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. पण लग्नानंतर मी तलासरीत राहायला आली. माझे पती हे आदिवासी मुलांच्या शाळेतच आर्ट शिक्षक आहेत. या भागात काही काळ घालवल्यानंतर मला आदिवासी समजासाठी काही तरी करण्याची इच्छा झाली. त्यानंतर मी जोमाने कामाला लागली.

- मानसी गवादे


"इच्छा तिकडे मार्ग" 

फक्त समाजकार्यातच नाही तर मानसी यांचा स्वत:चा व्यवसाय देखील आहे. जेव्हा त्यांना विचारलं की समाज कार्य, व्यवसाय आणि घर यांची सांगड कशी घालता? तेव्हा त्या हसत हसत म्हणाल्या, इच्छा तिकडे मार्ग... सर्वात महत्त्वाचं मला कुटुंबाकडून आणि नातेवाईकांकजून मिळणारा पाठिंबा. माझे पती हितेंद्र गवादे यांच्यामुळे मी या क्षेत्रात आले आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे मला आदिवासी समाजासाठी चांगले काम करता आले.   

मानसी यांचं बीएड पर्यत शिक्षण झालंय. शिवाय त्यांनी MBA देखील केलं आहे. शिक्षण पूर्ण करण्याचं सारं श्रेयं ते त्यांचे पती हितेंद्र गवादे यांना देतात. लग्नाआधी मानसी यांचं डिएडचं पहिलं वर्ष झालं होतं. लग्नानंतर त्यांनी डिएडचं दुसरं वर्ष पूर्ण केलं.

"अडचणींचा डोंगर"

डिएडचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी आदिवासी पाड्यातील शाळेत शिक्षिका म्हणूनही काम पाहिले आहे. शिक्षिका असतानाच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सांगितले की, १९९९-२००० सालात मी सुत्रधार नावाच्या शाळेत शिक्षिका म्हणून लागली. त्यावेळी तलासरी इतका विरसित नव्हता. आतकाही तितका विकसित नाही. पण त्यावेळी शाळेत जायचं म्हणजे ७-८ किलोमीटर चालावं लागायचं. त्यामुळे विद्यार्थी शाळेत यायचे नाहीत. अशा परिस्थितीत विदर्यार्थ्यांना आणण्यासाठी मी घरोघरी चालत जायचे. तेव्हा मी किती चालले असीन हे मला ही सांगता येणार नाही. भर उन्हात मी माझ्या मुलांना घेऊन घरोघरी भटकायचे.

त्यामुळे मानसी यांच्या समाजकार्यात अडचणी बऱ्याच आल्या. पण त्यांनी हिम्मत कधीच हारली नाही आणि आपलं समाजकार्य सुरू ठेवलं.

मानसी आज अभिमानानं सांगतात की, माझ्या हाताखालून गेलेली बरीच मुलं आज चांगले कलाकार आहेत. मोठ्या मोठ्या महाविद्यालयांमध्ये चित्रकलेचे शिक्षण घेत आहेत. तर काहींनी स्वत: व्यवसाय सुरू केला आहे. त्यांचा हा अभिमान मला त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.

स्वयंप्रेरणेतून एका ध्यासाने मोठं कार्य उभारणाऱ्या, आपल्या स्वत:च्या आवडत्या कार्यातून समाजाला काय द्यायचं आहे हे समजून-उमजून त्याच पद्धतीने वाटचाल करणाऱ्या मानसी गावंदे याच्या जिद्दीला सलाम...

मानसी गवादे, मंजिरी आर्ट अन्ड कल्चर

E-mail :- manasimanjiri@gmail.com

Website :- https://www.manjirifoundation.com


हेही वाचा

गरब्यासाठी दोन दिवस रात्री बारापर्यंत परवानगी

भाजपचा यंदा मुंबईत 300 ठिकाणी "मराठी दांडिया’

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा