गणेशोत्सवासाठीच्या पूर्वतयारीचा महापौरांकडून आढावा

 Mumbai
 गणेशोत्सवासाठीच्या पूर्वतयारीचा महापौरांकडून आढावा

मुंबईत गणेशोत्सव थाटात साजरा केला जातो. तसेच हा उत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातून नागरिक मुंबईत येत असतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा महापौर स्नेहल आंबेकर यांनी आढावा घेतला असून, सर्व यंत्रणा सतर्क व सुसज्ज ठेवाव्यात, असे आदेश त्यांनी दिले आहेत. 

गणेश मूर्ती विसर्जन स्थळांवर अतिरिक्त तराफे, बोटी, जीवरक्षक, स्टील प्लेटस्, मोटरबोट, प्रथमोपचार केंद्र व रुग्णवाहिका, तात्पुरती शौचालये, जर्मन तराफा, सर्च लाईट, स्वागत कक्ष आदींची पुरेशी व्यवस्था महापालिका प्रशासनाने केल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. संजय देशमुख यांनी गणेशोत्सवासाठी पालिका प्रशासनाने आवश्यक ती पूर्वतयारी केली असून, वेळोवेळी घेतलेल्या आढाव्यानुसार प्रशासनातर्फे आवश्यक त्या साधन सामुग्रीत वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. 

Loading Comments