Advertisement

'बाप्पाच्या पुढ्यात ठेवलेली फळं वाया जावू नये' रोटी बँकेचं आवाहन


'बाप्पाच्या पुढ्यात ठेवलेली फळं वाया जावू नये' रोटी बँकेचं आवाहन
SHARES

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान घरोघरी आणि मंडळांच्या बाप्पाला विविध प्रकारच्या मोदकांसोबत फळांचा नैवेद्य दाखवला जात आहे. अशावेळी मोठ्या प्रमाणात बाप्पापुढे फळं जमा होत आहेत. मात्र ही फळ वाया जाऊ न देता ती रोटी बँकेला द्यावीत, ज्यामुळे अनाथ मुलांची पोट भरतील, असं आवाहन रोटी बँकेनं सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना केलं आहे.


रोटी बँकेचं आवाहन

दररोज आपण मोठ्या प्रमाणात अन्न वाया घालवत असतो. परंतु, हेच अन्न कोणाचं तरी पोट भरु शकतं. त्याचप्रमाण, जगाची एकूण लोकसंख्या ७०० कोटी आहे. त्यापैकी ११ टक्के लोक म्हणजेच ७९ कोटी ५० लाख लोक उपाशी आहेत. अमेरिका, इंडोनेशिया आणि ब्राझिल या जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या देशांच्या एकूण लोकसंख्ये एवढे लोक जगात उपाशी असतात.

यांपैकी भारतात उपाशी राहणाऱ्यांची संख्या तब्बल १९ कोटी ५० लाख एवढी आहे. त्यामुळ ही परिस्थिती बदलायची असेल तर अन्न वाया जावू न देता, ते अन्न भुकेलेल्यांपर्यंत पोहचवा, असं आवाहन रोटी बँकेनं सर्व गणपती मंडळांना केलं आहे.

भारतात दररोज ३ हजार मुलांचा कुपोषणानं मृत्यू होतो. मुंबईत यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे विशेषता दक्षिण मुंबईतील गणपती मंडळांना आम्ही आवाहन केलं आहे की, आपल्या गणपती समोर प्रसाद म्हणून जमा होणारी फळं वाया जावू देऊ नका ती रोटी बँकेला द्या.
- सुभाष तळेकर, संस्थापक, रोटी बँक, मुंबई

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा