Advertisement

‘शिवडीच्या राजा’ला उल्लेखनीय सजावटीचा मान


‘शिवडीच्या राजा’ला उल्लेखनीय सजावटीचा मान
SHARES

परळ - शिवसेना दक्षिण मुंबई विभागाच्यावतीनं गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2016 चं आयोजन करण्यात आले होतं. यात विजयी झालेल्या स्पर्धकांना मोरया पुरस्कार वितरण सोहळ्यांतर्गत 29 नोव्हेंबरला गौरवण्यात आलं.
या स्पर्धेत मूर्ती सजावटीपासून, सामाजिक देखावे आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा अशा विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात दक्षिण मुंबई विभागातील 19 शाखांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी शिवडी मध्यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला (शिवाडीचा राजा) शिवडी विधानसभेतून उल्लेखनीय सजावट केल्याबद्दल प्रथम पारितोषिक महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते देण्यात आलं. या वेळी नगरसेविका श्वेता राणे, मंडळाचे सचिव श्रीकांत जाधव, खजिनदार संदीप पाटेकर, उपाध्यक्ष उमेश नाईक, संतोष धरणे आदी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement