शिवसेनेकडून दादरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा

 Dadar
शिवसेनेकडून दादरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा
Dadar , Mumbai  -  

दादर - गुढीपाडव्यानिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही शितलादेवी मंदिरापासून प्रभादेवी मंदिरापर्यंत भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ढोलताशा आणि पारंपरिक वाद्यांचा यामध्ये समावेश आहे. माहिमपासून प्रभादेवीपर्यंतच्या सर्व शिवसेनेच्या शाखांमधील कार्यकर्ते आणि विभागातील शिवसैनिक या शोभायात्रेत सहभागी झालेले दिसून येत आहेत. ही शोभायात्रा सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. यामध्ये स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांच्यासह खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवरणकर त्याच बरोबर वॉर्ड क्रमांक 194 चे नवनिर्वाचित नगरसेवक समाधान सरवरणकर देखील सहभागी होणार आहेत. शितलादेवी येथून सुरू झालेली ही शोभायात्रा शिवसेना भवन, जाखादेवी मंदिर, प्रभादेवी मंदिर येथून मार्गस्थ होणार आहे.

Loading Comments