सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

  Vidhan Bhavan
  सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
  मुंबई  -  

  मंत्रालय - राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य शासनानं दिवाळीची भेट दिलीय. दिवाळी पूर्वी ऑक्टोबर महिन्याचा पगार हातात मिळणार असून महागाई भत्‍त्‍याची थकबाकी रोखीने मिळणार आहे. 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्‍ट 2016 या दरम्यानची महागाई भत्‍त्‍याची थकबाकी रोखीनं देण्‍याचा निर्णय वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलाय. राज्‍य शासनाच्‍या वित्‍त विभागाने 20 ऑक्‍टोबर 2016 रोजी या बाबतचा शासन निर्णय काढला आहे.

  राज्‍य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालीक कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्‍त्‍याचा दर 119 टक्‍क्‍यावरून 125 टक्‍के करण्‍यात आला आहे. तसेच 1 सप्‍टेंबर 2016 पासून या महागाई भत्‍त्‍याच्‍या वाढीची रक्‍कम रोखीने देण्‍यात आलीय. ऑक्‍टोबर महिन्‍याचे वेतन आणि निवृत्‍तीवेतन दिवाळीपूर्वी 25 ऑक्‍टोबर 2016 करण्‍याचे निर्देश वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. त्‍याचप्रमाणे राज्‍यातील राज्‍य शासकीय निवृत्‍ती वेतन धारक आणि कुटुंब निवृत्‍ती वेतन धारकांना ऑक्‍टोबर 2016 या महिन्‍याचे निवृत्‍ती वेतन 25 ऑक्‍टोबर 2016 पूर्वी देण्‍याचे निर्देशही शासन परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.