Advertisement

भाऊबीजला यमद्वितीया का म्हणतात?


भाऊबीजला यमद्वितीया का म्हणतात?
SHARES

कार्तिक महिन्याच्या द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. याला 'यमद्वितीया' असेही म्हणतात. भावा बहिणीच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम आणि उत्कटता स्पष्ट करणारा हा दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते, त्याच्यासाठी गोडाचे जेवण करून त्याला खाऊ घालते. पूर्वी लग्न झालेल्या मुलीला एकदा सासरी गेल्यावर माहेरी यायलाच मिळत नव्हते. त्यामुळे भाऊबीजेला वर्षातून एक दिवस भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिची खुशाली विचारतो अशी पद्धत भारतात प्राचीन काळापासून सुरू आहे.


यमद्वितीया म्हणजे काय?

एका अख्यायिकेनुसार, या दिवशी यमाची बहीण यमी हिने भावाला जेवणाचे आमंत्रण दिलेले असते. बहिणीने वारंवार आपल्या घरी जेवण्यासाठी येण्याची विनंती केल्यानंतरही यम तिच्या घरी जात नाही. कारण आपण लोकांचे प्राण हरतो, आपल्याला कोणीही आमंत्रण देत नाही. त्यामुळे जर आपण आपल्या बहिणीच्या घरी गेलो आणिे आपण तिच्या पतीचे प्राण घेतले तर? असा प्रश्न यमाला पडतो. 

अखेर यमीने वारंवार घरी येण्याची विनंती केल्यानंतर कार्तिक महिन्याच्या द्वितीयेला यम तिच्या घरी जातो. आपला भाऊ घरी आल्यानंतर यमी गोडाधोडाचे जेवण करून त्याला खायला घालते. त्याचे औक्षण करते. बहिणीचे प्रेम पाहून यम प्रचंड खूश होतो. तो यमीला वर मागण्यास सांगतो. तेव्हा या दिवशी जी बहीण आपल्या भावाला ओवाळेल त्या भावाला मृत्यूची भीती राहणार नाही' असे वर ती यमाकडे मागले. त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळण्याची प्रथा आहेे.



हेही वाचा - 

वाचा, बलिप्रतिपदा आणि बळी राजाची कहाणी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा