Advertisement

‘त्या’ मुलांनी केली बाप्पांची आरती


SHARES

दादर - गणेशोत्सवाचा काळ म्हणजे बच्चेकंपनीसाठी आनंदाची पर्वणी. त्यामुळे चतुर्थीच्या दिवसांत घरोघरी लहान मुलांचा आनंद ओसंडून वाहत असतो. पण देहविक्री करणा-या महिलांच्या मुलांच्या नशिबी असे सुख नसते. अशा मुलांना गणेश चतुर्थीचा आनंद मिळवून देण्यासाठी 'साई' या संस्थेनं पुढाकार घेतला आहे. 'सोशल अॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन' या संस्थेच्या प्रयत्नाने देहविक्रीचा व्यवसाय करणा-या महिलांच्या मुलांना गपपतीची आरती करण्याचा मान मिळाला. बुधवारी दादरमधील बालगोपाळ मित्रमंडळाच्या गणपतीसमोर या मुलांनी आरती केली.

कामाठीपुरात देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांना समाजाकडून हीन दर्जाची वागणूक दिली जाते. ‘ती’ मुलं असेच त्यांना संबोधले जाते. या मुलांना 'सोशल अॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन' अर्थात साई ही संस्था शैक्षणिक, आरोग्य दृष्ट्या मदत करते. ही मुले देखील या समाजाचीच घटक आहेत.त्यांना योग्य तो मान मिळाला पाहिजे, हा संदेश समाजात जावा या उद्देशाने आरतीचा मान ‘त्या’ मुलांना देण्यात आला. यावेळी दादर पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस आयुक्त सुनील देशमुख आणि वरिष्ठ अधिकारी शांतीलाल जाधव देखील उपस्थित होते. मिस्टर ऍन्ड मिसेस अनवॉन्टेड या आगामी चित्रपटाची अभिनेत्री स्मिता गोंदकर, दिग्दर्शक दिनेश अनंत यांनी देखील उपस्थिती लावली.

 

संबंधित विषय
Advertisement