चला खेळूया अशी होळी...

मुंबई - कोणे एकेकाळी ७ बेटांचा एक समूह. काळ बदलला तसं या 7 बेटांचं मिळून एक महानगर अस्तित्वात आलं. त्याचं नाव मुंबई. एक असं शहर जे कधीच झोपत नाही असं म्हणतात. इथले अनेकविध उत्सव आणि त्याहून अधिक वैविध्यपूर्ण संस्कृती ही मुंबईची ओळख. या शहराची पाळंमुळं घट्ट करण्यात आणि त्याला स्थैर्य देण्यात इथल्या कोळी बांधवांचं मोठं योगदान राहिलंय. त्यामुळे मुंबईच्या संस्कृतीचा ते एक अविभाज्य भाग बनले. हे कोळी बांधव त्यांचे सण-उत्सव उत्साहात साजरा करण्याच्या त्यांच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. कोळी बांधवांची पारंपरिक होळी. होळी सणाच्या पूर्वसंध्येला मुंबई लाइव्हसोबत तुम्ही करणार आहात होळी साजरी. तीही कोळी बांधवांच्या परंपरागत पद्धतीने, चला तर मग!

Loading Comments