वरळीत सजला ६५ फूट उंच ख्रिसमस ट्री!

जगभरातलं सोडून द्या पण, तुम्हाला माहितीये भारतातील सर्वात मोठा ख्रिसमस ट्री ही मुंबईत आहे. या ख्रिसमस ट्रीची उंची ६५ फूट म्हणजे ७ मजल्यांच्या इमारतीपेक्षाही उंच आहे. वरळीतील आदर्श नगर मध्ये हा ख्रिसमस ट्री मोठ्या दिमाखात उभा आहे.

  • वरळीत सजला ६५ फूट उंच ख्रिसमस ट्री!
  • वरळीत सजला ६५ फूट उंच ख्रिसमस ट्री!
  • वरळीत सजला ६५ फूट उंच ख्रिसमस ट्री!
SHARE

नाताळात विशेष महत्त्व असतं ते ‘ख्रिसमस ट्री’ला. आता तुम्ही फेसबुक, व्हॉट्स अॅपवर जगभरातील विविध आकर्षक वस्तूंनी सजवलेल्या ख्रिसमस ट्री पाहिल्या असतील. जगभरातलं सोडून द्या पण, तुम्हाला माहितीये भारतातील सर्वात मोठा ख्रिसमस ट्री ही मुंबईत आहे. या ख्रिसमस ट्रीची उंची ६५ फूट म्हणजे ७ मजल्यांच्या इमारतीपेक्षाही उंच आहे. वरळीतील आदर्श नगर मध्ये हा ख्रिसमस ट्री मोठ्या दिमाखात उभा आहे.


झाडाची लिम्कामध्ये नोंद

वरळीत राहणाऱ्या डगलस सलदान्हा यांच्या मालकीचा हा ख्रिसमस ट्री आहे. गेल्या ४५ वर्षांपासून ते या झाडाची काळजी घेत आहेत. डगलस यांच्या शेजाऱ्यांनी आपल्या अंगणात ख्रिसमस ट्री लावला होता. ४० वर्षांपूर्वी त्यांनी २५० रुपयांना शेजाऱ्यांकडून हा ख्रिसमस ट्री खरेदी केला होता. गेल्या चाळीस वर्षांत या ट्रीची उंची ६५ फूटांवर पोहोचली. त्यांच्या या झाडाची २०१२ साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्येही नोंद झाली होती.


बहिणीची शेवटची इच्छा

डगलस यांच्या या ख्रिसमस ट्रीशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. त्यांनी आणि त्यांच्या बहिणींनी मिळून या ख्रिसमस ट्रीची काळजी घेतली होती. काही वर्षांपूर्वी कॅन्सरमुळे डगलस यांच्या बहिणीचं निधन झालं. त्यांच्या बहिणीची शेवटची इच्छा होती की, ख्रिसमस ट्री खूप सजवावी. म्हणजे मला स्वर्गातून पाहता येईल. तिच्या इच्छेनुसार २००५ पासून ख्रिसमस ट्री सजवण्यात येते. पण ख्रिसमस ट्रीच्या निमित्तानं या आठवणी आजही जिवंत आहेत.


ख्रिसमस ट्रीची खासियत

ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी त्यांना जवळपास एक लाख रुपये खर्च येतो. रंगीबेरंगी लाईट्स आणि शोभेच्या वस्तूंनी हा ख्रिसमस ट्री सजवण्यात आला आहे. जवळपास १० हजार लाईट्स ट्रीवर लावण्यात येतात. हा ख्रिसमस ट्री पाहण्यासाठी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मुंबईतील अनेक लोक वरळीच्या या भागात येतात. तसं पाहायला गेलं तर याहीपेक्षा मोठी आणि प्रचंड उंच ख्रिसमस ट्री भारतात असतील. पण मुंबईत नैसर्गिकरीत्या वाढवलेलं, आणि ख्रिसमससाठी पूर्ण सजवलेलं हे एकमेव झाड असावं, असा दावा सल्डाना यांनी केला आहे.संबंधित विषय
ताज्या बातम्या